उन्हाळी सोयाबीनचा पेरा मोठा ; शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी ?

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील मुख्य पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करतात. मागील काही वर्षांपासून सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. सध्या उन्हाळी सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यंदाचा पेरा देखील विक्रमी झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात तर वाढ होईलच मात्र त्या बरोबर खरिपसाठी उत्तम बियाणे देखील शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. बऱ्याचदा बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते त्यामुळेच कृषी विभागाने बियाण्यांच्या उप्लब्धतेसाठी सोयाबीनचा पेरा करण्याचे आवाहन केले होते.

उन्हाळी सोयाबीनची अशी घ्या काळजी..
— पीक 20 ते 25 दिवसाचे असताना मशागत करुन सोयाबीन तणविरहीत ठेवणे गरजेचे आहे.
–मशागतीची कामे ही फुले लागण्याच्या आगोदरच करणे गरजेचे अन्यथा सोयाबीनच्या मुळांना नुकसान होते.
–सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाठानी पाणी द्यावे लागणार आहे.
–शेतामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
–उन्हाळी सोयाबीनची उत्पादकता कमी असली तरी बियाणाच्या अनुशंगाने योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
–सोयाबीनवर पाने कुरताडणारी अळी, घाटेअळी, शेंगा पोखरणारी अळी याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच फवारणी करणे गरजेचे आहे.