Agriculture Business : ‘हा’ शेती आधारित उद्योग सुरु करा; मिळेल प्रतिमहा लाखो रुपयांचे उत्पन्न!

Agriculture Business For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांपासून अवेळी पडणारा पाऊस, येणारी नैसर्गिक संकटे यामुळे शेतीतून (Agriculture Business) फारच तुटपुंजे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. ज्यामुळे सध्या ग्रामीण भागातील तरुणांना शेतीआधारित उद्योगांमध्ये उतरणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील ग्रामीण भागात शेतीसोबतच एखादा शेतीआधारित उद्योग करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण अशाच एका भन्नाट कृषी प्रक्रिया उद्योगाबाबत जाणून घेणार आहोत. ज्यातून तुम्ही मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाई (Agriculture Business) करू शकतात.

व्यवसाय निवड महत्वाची (Agriculture Business For Farmers)

व्यवसाय करताना त्यासाठी लागणारा पैसा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ साधणे खूप गरजेचे असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादित मालाला बाजारपेठ मिळणे ही आहे. व्यवसाय करताना कायम वर्षभर मागणी असणाऱ्या व्यवसायाची निवड (Agriculture Business) आणि कमीत कमी भांडवल होणाऱ्या व्यवसायाची निवड करणे महत्वाचे ठरते. या सर्व बाबींमध्ये एकदम तंतोतंत बसणारा व्यवसाय म्हणजे पोहा मॅन्युफॅक्चरिंग उद्योग हा अगदी 20 ते 25 हजार रुपयांमध्ये देखील सुरू करता येऊ शकतो.

पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट

नाष्टा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चटकन पोहे दिसतात. पोहा पौष्टिक तसेच पचायला देखील सोपा असतो. ज्यामुळे त्याला घराघरात मागणी असते. इतकेच नाही तर हॉटेल स्टॉल या ठिकाणी देखील मोठी मागणी असते. त्यामुळे तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारला तर तुमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो.

पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटची किंमत साधारणतः दोन लाख 43 हजार रुपये आहे. परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून 90 टक्‍क्‍यांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. अर्थात तुम्ही तुमचे स्वतःचे पंचवीस हजार रुपये या व्यवसायात टाकून आणि बाकीचे कर्ज अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू करू शकतात.

कोणत्या गोष्टी लागतात?

हा व्यवसाय तुम्हाला सुरू करण्यासाठी पाचशे चौरस फूट जागेची गरज भासते. तसेच पोहे मशीन, पॅकिंग मशीन तसेच भट्टी आणि इतर लहान लहान गोष्टी आवश्यक असतात. तुम्ही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालाचा विचार केला तर त्यानुसार सुरुवातीला थोडासा कच्चामाल आणून हळूहळू सुरुवात करावी व नंतर अनुभव जसा जसा येत जाईल व मार्केट वाढेल त्या पद्धतीने व्यवसायात वाढ करणे गरजेचे आहे.

कसे असते नफ्याचे गणित?

तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केल्यानंतर कच्चामाल लागतो. यासाठी तुम्हाला सहा लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच यासोबत तुम्हाला अतिरिक्त 50 हजार रुपये खर्च करावे लागतात. एवढ्या भांडवलावर तुम्ही एक हजार क्विंटल पोहे तयार करू शकतात व याचा उत्पादन खर्च आठ लाख 60 हजार रुपये येऊ शकतो. ते एक हजार क्विंटल पोहे तुम्ही दहा लाख रुपयांना विकले तरी तुम्ही जवळपास एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत नफा मिळवू शकतात.