हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या शेतीमध्ये महिला शेतकरी (Agriculture Business) पुढे येऊन जबाबदारी आपल्या खांदयावर घेताना दिसत आहे. अलीकडे भाडे तत्वावर जमीन घेऊन राज्यात अनेक महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधल्याच्या अनेक यशोगाथा समोर आल्या आहेत. अशातच आता एका महिला शेतकऱ्याने गावातील महिलांना सोबत घेऊन शेणापासून वर्मी कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रकल्प उभारला आहे. या महिला एकत्र येत, वर्मी कंपोस्ट खत तयार करण्याच्या व्यवसायातून वार्षिक 7 ते 8 लाख रुपयांची कमाई करत आहे. ज्यामुळे त्यांच्या या व्यवसायाची (Agriculture Business) सध्या मोठी चर्चा होत आहे.
महिलांना सोबत घेऊन उभारला प्रकल्प (Agriculture Business For Farmers)
पूनम सिंह असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या उत्तर प्रदेशातील सुलतानपुर जिल्ह्यातील हड़हरा गावच्या रहिवासी आहेत. पूनम यांनी गावातील महिलांना एकत्र करत, सुरवातीला स्वतःच्या शेतीसाठी त्यांनी वर्मी कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यात त्यांना खूपच यश मिळाले. ज्यामुळे सध्या त्या मागील तीन वर्षांपासून वर्मी कंपोस्ट खत प्रकल्प (Agriculture Business) उभारून, शेतकऱ्यांना खताची विक्री करत आहेत. सध्याच्या घडीला रासायनिक खतांच्या अति वापरामुळे उत्पादन खूपच कमी मिळत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या सेंद्रिय खतांच्या वापराकडे ओढा वाढला आहे. ज्यामुळे शेतकरी मोठ्या संख्यने आपल्याकडे खत खरेदीसाठी येत असल्याचे शेतकरी पूनम सिंह सांगतात.
किती आहे किंमत?
शेतकरी पूनम सिंह सांगतात, माझ्या पतींची वडिलोपार्जित 2 ते 3 एकर शेती असून, आपण त्यात गहू आणि वाटाणा ही पिके घेतो. मात्र, शेती कमी असल्याने आपण गावातील शेतकरी महिलांना सोबत घेऊन वर्मी कंपोस्ट खत प्रकल्प (Agriculture Business) उभारण्याचा निर्धार केला. त्यानुसार प्रथम स्वतःच्या शेतीसाठी मिळालेले यश पाहून आम्ही आता गावातील तसेच आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट खताची विक्री करत आहोत. साधारणपणे 25 किलोच्या एका गोणीसाठी आम्ही 700 रुपये इतकी किंमत आकारतो. ज्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही या व्यवयसायाकडे पाहत असल्याचे त्या सांगतात.
कशी करतात खत निर्मिती?
शेतकरी पूनम सिंह सांगतात, आपण वर्मी कंपोस्ट खत निर्मितीसाठी विटांच्या मदतीने खड्डे बनवले आहे. ज्यामध्ये वनस्पतीजन्य कचरा, सुका कचरा हा प्रामुख्याने 60:40 या प्रमाणात टाकला जातो. हिरव्या वनस्पतींचा पाल्याचा थर दिला जातो. यामध्ये 8 ते 10 शेणाचे गोळे ठेऊन शेणाचा थर दिला जातो. अशा पद्धतीने सर्व सोपस्कार पूर्ण करत जवळपास 45 दिवस पिकांच्या ताटांनी, गोण्या आणि नारळाच्या झापांनी हा खड्डा 45 दिवस झाकून ठेवला जातो. त्यांनतर तयार खताची गोण्या भरून विक्री केली जाते.