Agriculture Business : लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग; लागते ‘ही’ यंत्रसामुग्री, वाचा…भांडवल!

Agriculture Business For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, सध्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या प्रक्रिया उद्योगामध्ये (Agriculture Business) उतरणे क्रमप्राप्त ठरत आहे. प्रामुख्याने शेतमालावर प्रक्रिया उद्योगामध्ये विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग येतात. जसे की टोमॅटो प्रक्रिया उद्योग, बटाटा प्रक्रिया उद्योग असे बऱ्याच प्रकारचे उद्योग यामध्ये येतात. शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये अनेक तरुण यशस्वी झाले असून, त्यांनी स्वतःची आर्थिक उन्नती देखील साधली आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये एक वेगळा उद्योग म्हणजे लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती करण्याचा उद्योग (Agriculture Business) आहे. आज आपण या उद्योगाबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

का सुरु करावा ‘हा’ उद्योग? (Agriculture Business For Farmers)

शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा व सोनेरी संधी असणारा उद्योग ठरू शकतो. हा व्यवसाय (Agriculture Business) सुरू करायचा असेल तर तुम्हाला याची पुरेशी माहिती व योग्य व्यवस्थापन केले तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हा उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला खूप काही गुंतवणूक करण्याची गरज नाही. म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा याच्या एकंदरीत बाजारपेठेचा विचार केला तर गुंतवणूक कमी व नफ्याचे प्रमाण जास्त अशा प्रकारचा हा उद्योग आहे. शेतकरीच नाही तर ग्रामीण भागातील महिला देखील या व्यवसायत उतरू शकतात. किंवा साईड बिझनेस म्हणून देखील हा व्यवसाय तरुण करू शकतात.

छोटेखानी व्यवसाय कसा कराल?

तुम्हाला लाकडी घाण्यावरील हा व्यवसाय अगदी छोटासा गाळा घेऊन देखील स्मॉल स्केलवर म्हणजे छोट्या पद्धतीने सुरू करू शकतात. यामध्ये तुम्ही गाळ्याच्या मागच्या भागात एक प्रोडक्शन युनिट आणि समोर तुमचे विक्री युनिट अर्थात सेलिंग युनिट उभारू शकतात. फक्त या उद्योगाचे प्रमोशन आणि मार्केटिंग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. या उद्योगाचे एक मार्केटींग तुम्ही वर्कआउट केली तर तुमचा एक बेसिक फार्मूला तयार होतो तुम्हाला नक्की कसे पुढे जायचे आहे हे डेफिनेटली कळते. तुमचे उत्पादन प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे

साधारणपणे 13 किलोचा घाणा असतो यासाठी एक तास वेळ लागतो. 13 किलो शेंगदाण्याच्या घाण्यापासून सुमारे पाच ते साडेपाच किलो तेल मिळते. तसेच खोबऱ्याचा घाना 22 किलोचा असतो. त्यातून जवळपास 50 टक्के तेल निघते. यामधून तयार झालेले तेल मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते व यात तेलामधील असणारे कण खाली स्थिर होतात व चांगले असणारे तेल आपल्याला वरील बाजूला मिळते.

कोणती यंत्रसामुग्री लागते?

या उद्योगाला प्रामुख्याने कमीत कमी दोन लाख रुपये भांडवल लागते. तर सूर्यफूल, शेंगदाणा या कच्च्या मालासह तेल स्टोरेज करण्यासाठी टाकी आणि पॅकिंगसाठी बॉटल्स आवश्यक असतात. यंत्रसामग्रीसाठी 3 एचपीचा मोटर घाना लागतो. अर्थात सर्व यंत्रसामग्रीची किंमत एक लाख 37 हजार रुपयांपर्यंत असते. या व्यवसायासाठी तुम्हाला साधारणपणे दोन किंवा तीन व्यक्तींची आवश्यकता भासते. तुम्ही आपले तयार तेल आजूबाजूचे किराणा दुकानांमध्ये विकू शकता किंवा मोठे मोठे मॉल्सला सुद्धा तुम्ही तुमचे उत्पादन विकू शकतात.