Agriculture Business: आता गावातूनच करू शकता ‘हा’ व्यवसाय; मृदा आरोग्य कार्ड योजनेचा मिळेल लाभ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही कृषी डिप्लोमाधारक किंवा पदवीधर (Agriculture Business) असाल आणि तुम्हाला कृषिविषयक काही व्यवसाय करायचा आहे, आणि तुम्ही जास्तीत जास्त एक ते सव्वा लाखापर्यंत गुंतवणूक करू शकत असाल तर हा व्यवसाय आहे खास तुमच्यासाठी. आणि मुख्य म्हणजे सरकार या व्यवसायासाठी (Agriculture Business) 4.4 लाख रूपयांचे अनुदान सुद्धा देते.

आम्ही ज्या व्यवसायाबद्दल (Agriculture Business) बोलत आहोत तो म्हणजे ‘माती परीक्षण व्यवसाय’ (Soil Testing) यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्याच्या शेतातील मातीचे परिक्षण करायचे आहे, तो शेतकरी तुम्हाला माती आणून देईल. त्यानंतर तुम्हाला परिक्षण केंद्रावर मातीची तपासणी करावी लागेल. यासाठी संबंधित शेतकर्‍याला नमुन्यासाठी 300 रुपये द्यावे लागतील. या माध्यमातून तुम्ही महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मिळवू शकता.

मृदा आरोग्य कार्ड योजना (Soil Health Card Scheme)

केंद्र सरकारने (Government) माती परीक्षण केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड नावाची योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत, पंचायत स्तरावर लहान माती परीक्षण केंद्रे उघडण्यासाठी सरकार मदत करते. या लॅबमध्ये पंचायत आणि आजूबाजूच्या गावांच्या शेतातील मातीची चाचणी केली जाते. विशेष म्हणजे दोन प्रकारची माती परीक्षण केंद्रे आहेत. पहिली म्हणजे स्थावर माती परीक्षण प्रयोगशाळा, म्हणजे दुकान भाड्याने घेऊन माती परीक्षण केंद्र सुरू (Agriculture Business) करू शकता. हे दुकान तुम्ही गावातही सुरू करू शकता. तर दुसरी मोबाईल माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. या अंतर्गत, तुम्हाला एक वाहन खरेदी करावे लागेल, ज्यामध्ये माती परीक्षण केंद्राची सर्व उपकरणे ठेवता येतील. या वाहनाद्वारे तुम्ही गावोगावी जाऊन माती परीक्षण करून चांगला नफा मिळवू शकता.

मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत माती परिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी नियम

  • मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत केवळ 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकच मिनी माती परीक्षण केंद्रे (Mini Soil Testing Lab) उघडू शकतात.
  • याशिवाय त्याला कृषी चिकित्सालय आणि शेतीविषयी चांगले ज्ञान असावे.
  • माती परीक्षण प्रयोगशाळा उघडण्यासाठी तुमचे स्वत:चे किंवा भाड्याचे कायमस्वरूपी घर असणे आवश्यक आहे.
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे.

मृदा आरोग्य कार्ड योजना अनुदान

पंचायत स्तरावरील माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी 5 लाख रूपयांची गरज आहे. पण सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत माती परीक्षण केंद्र उघडल्यास सरकारकडून 75 टक्के अनुदान दिले जाईल. म्हणजे तुम्हाला सरकारकडून अनुदान म्हणून 3.75 लाख रुपये मिळतील. तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 1.25 लाख रुपये खर्च करावे लागतील.

कुठे संपर्क करावा? (Agriculture Business)

माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी agricoop.nic.in वेबसाइट आणि soilhealth.dac.gov.in वर अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर देखील कॉल करू शकता. कृषी अधिकारी तुम्हाला एक फॉर्म देतील. तुम्हाला फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती कृषी विभागाकडे जमा करावी लागतील.

योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि लघु माती परीक्षण केंद्र उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जाऊन उपसंचालक किंवा सहसंचालकांना भेटावे लागेल.