Agriculture Business : कमी भांडवलात सुरु करा ‘हा’ शेतीआधारित व्यवसाय; होईल बक्कळ कमाई!

Agriculture Business Duck Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना (Agriculture Business) त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नाहीये. विदर्भ मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन तर उत्तर महाराष्ट्रातील कांदा पिकाला सध्या उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले आहे. मागील काही काळापासून अनेक पिकांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे. परिणामी, सध्या शेतकरी अर्थार्जनाचा दुसरा मार्ग निवडताना दिसत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही पोल्ट्री व्यवसायापेक्षा (Agriculture Business) अधिकची कमाई करू शकतात.

होईल भरघोस कमाई (Agriculture Business Duck Farming)

राज्यात प्रामुख्याने शेतकरी शेतीला जोडधंदा (Agriculture Business) म्हणून डेअरी व्यवसाय, शेळीपालन व्यवसाय किंवा मग पोल्ट्री व्यवसायाकडे वळतात. ज्यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होते. मात्र तुम्ही एखादा नवीन शेती आधारित व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ‘बदक पालन व्यवसाय’ हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. प्रामुख्याने पोल्ट्री व्यवसाय हा कोंबडी पालनातून अधिक उत्पन्न मिळून देणारा व्यवसाय मानला जातो. शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय करतात. मात्र, बदक पालनातील बारकावे लक्षात घेतल्यास, यातून देखील मोठ्या प्रमाणात कमाई केली जाऊ शकते.

बदक पालनाची वैशिष्ट्ये

  • बदक आपल्या आहारातील बराच भाग हा बाहेर फिरून मिळवतो. यामध्ये ते काही गवताची बिया, हिरवी पाने, कीटक आणि कृमी खात असतात. ज्यामुळे तुमचा खाद्यावरील खर्च कमी होणार आहे.
  • अर्थात हिरव्या भाज्या, चिरलेले गवत आणि तण (रासायनिक तणनाशक-कीटकनाशक न वापरलेले), वर्म्स, स्विस चार्ड, मटार आणि ओले ओटमील यासारख्या वस्तू बदक पालनात (Agriculture Business) खाद्य म्हणून तुम्ही वापरू शकतात. हे पदार्थ बदकाला सर्वाधिक आवडतात.
  • तुम्हाला बदक पालनासाठी शेड उभारून, तुम्ही नियमित खाद्य गोळा करण्यासाठी बाहेर सोडू शकतात.
  • विशेष म्हणजे बदक हे कोंबड्यांच्या तुलनेत खूपच समजदार असतात.
  • ज्यामुळे त्यांना कमी जागेत आणि कमी देखभालीमध्ये सांभाळले जाऊ शकते.
  • बदक पालन करताना, पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही सोबत मासे पालन व्यवसाय देखील करू शकतात. ज्यामुळे हंगामी का होईना मात्र, त्यांना छोटे मासे मिळण्यास मदत होईल.
  • बदक हे सकाळी 9 वाजेच्या आत अंडी देतात.
  • याशिवाय तुम्ही तुमच्या तळ्यात किंवा नदी किनारी मिळणाऱ्या शेवाळ वर्गीय वनस्पतींचा देखील खाद्य म्हणून वापर करू शकतात. त्यासाठी तुम्ही असे खाद्य जमा करून आणू शकतात.
  • बदक हे जवळपास 2 ते 3 वर्ष अधिक प्रमाणात अंडी देतात.
  • अगदीच व्यवस्था नसेल तर छोटेखानी जुन्या सर्वसाधारण राहत्या घरातही तुम्ही हा व्यवसाय करू शकतात.
  • याशिवाय पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांच्या लसींवर खूप खर्च होतो. त्या तुलनेत बदल पालनात लसींवर अधिकचा खर्च नसतो.

किती अंडी मिळतात?

एक मादी बदक वर्षभरात 280 ते 300 देते. बदकाचे अंडी देण्याचे प्रमाण हे कोंबडीच्या दुप्पट आहे. याशिवाय बदकाच्या अंड्याला बाजारात साधारपणे 9 ते 11 रुपये प्रति अंडे इतका दर मिळतो. याशिवाय बदकाच्या मांसाला देखील बाजारात खुप मागणी आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या व्यवसायात गुंतवणूक फार कमी असते. भांडवल खर्च कमी असल्याने शेतकरी यातून मोठ्या प्रमाणात नफा कमाऊ शकतात.