Agriculture Drone : शेतीसाठीच्या ड्रोनचे पायलट व्हायचेय? परभणी विद्यापीठात सुरु झालाय अभ्यासक्रम!

Agriculture Drone Pilot Course
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषी ड्रोन (Agriculture Drone) पायलट कोर्स घेण्यात येणार आहे. कृषी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम 18 मे पासून सुरु होत असून, या अभ्यासक्रमाकरिता सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स पुणे व परभणी कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये करार (Agriculture Drone) करण्यात आला आहे.

काय आहे पात्रता (Agriculture Drone Pilot Course)

ड्रोन पायलट अभ्यासक्रमाकरिता रिमोट पायलट लायसन्स धारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत. या अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्यामधे पीक निरिक्षण सेन्सर प्रणालीतून ड्रोन द्वारा विविध कार्य, पीक रोग तपासणी, फवारणीसारखी विविध कार्य करण्याकरिता संरचना व निर्मितीसारख्या शेतीविषयक नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कुठे कराल नोंदणी अर्ज?

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार असून, अभ्यासक्रमातील कृषी विषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना मार्गदर्शन मिळाले आहे. या अभ्यासक्रमाची माहिती htttp://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर ऊपलब्ध असून, या अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गूगल फॉर्मद्वारे संकेतस्थळावर नोंदीत करावा. असे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे.

काय फायदा होणार?

या अभ्यासक्रमानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय, ई. सारख्या क्षेत्रात नौकरी वा स्वत:चा व्यवसाय असा फायदा होऊ शकतो. मागील 4 वर्षापासुन नाहेप केंद्राने कृषी ड्रोन क्षेत्रात भरपूर कार्य केलेले आहे. सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स, पुणे ड्रोन संरचना, उत्पादन व कृषि संबंधित सेवा कार्य करीत असून, पाच वर्षाचा करार कालावधीदरम्यान कृषी ड्रोन संशोधन, चालक, चाचणी व दुरुस्ती सारख्या कार्याकरिता वनामकृवि सोबत कार्य करणार आहे. या करारातून दोन्ही संस्थांना निश्चित कार्य प्रणाली करण्यास आश्वासित करण्यात आले आहे.