हॅलो कृषी ऑनलाईन : बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. आजच्या लेखात राष्ट्रीय बायोगॅस योजना २०२१ बाबत जाणून घेऊया…
राष्ट्रीय बायोगॅस योजना
–केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना.
–केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जाते.
–100 % केंद्र पुरस्कृत योजना
–उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधीत यंत्रणेची
उद्देश
–ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे
–ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी
–बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी
–केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप
किती मिळते अनुदान
सर्वसाधारण गटासाठी – रू. 9,000/- प्रति संयत्र
अनुसूचित जाती व जमाती – रु. 11,000/- प्रति संयत्र
शौचालय जोडणी केल्यास – रु. 1,200/- प्रति संयत्र
कुठे कराल संपर्क
जिल्हा स्तरावर – कृषी विकास अधिकारी
तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी(कृषि)
आवश्यक कागदपत्रे
–पंचायत समितीकडील मंजुरी आदेश
–बायोगॅस संयंत्राच्या अनुदाना बद्दल करावयाच्या मागणीचा अर्ज
–बायोगॅस संयंत्र पूर्णत्वाचा दाखला
–बायोगास बांधकाम करणाऱ्या गवंड्याच्या हमीपत्र बांधकाम सुरू असलेले फोटो गवंडी सह
–प्रतिज्ञापत्र समजुतीचा नकाशा
–राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम 2021 असे अॅपलिकँट लिहिलेला लाभार्थी गवंडी यांचा फरशीसह फोटो
–घराचा उतारा आधार कार्ड लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स आदी…
संदर्भ – ग्राम विकास पपंचायत राज विभाग , महाराष्ट्र शासन