आयुर्वेदिक पिकांची शेती करा आणि लाखो रुपयांमध्ये कमवा; आरोग्यासही हितकारक

Ayurvedic plants farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । औषधी वनस्पतींची लागवड ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविते. तसेच, त्यांना निरोगी ठेवण्यासाठीही अतिशय प्रभावी आहे. प्राचीन काळापासून देशात औषधी वनस्पतींची लागवड व वापर होत आहे. औषधी वनस्पती या भारतीय आरोग्य आणि रोजीरोटी व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे, ज्याचा उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेदातही आहे. औषधी वनस्पतीची शेती वैज्ञानिकदृष्ट्या केल्याने आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. भारतातील निरनिराळ्या औषधी वनस्पतींमध्ये तुळशी महत्त्वपूर्ण आहे. कोरोना कालावधीमध्ये डॉक्टर काढा पिण्यास देखील सांगतात. त्यात तुळशीचे पान घालण्यास सांगितले जाते. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास अनेक प्रकारचे रोग बरे होतात. तुळशी हा एक दिव्य आणि पवित्र वनस्पती मानली जाते.

प्राचीन काळापासून तुळशी ही एक दिव्य आणि पवित्र वनस्पती मानली जात आहे. जिची पूजा प्रत्येक घरात केली जाते. तुळशीच्या वनस्पतीला धार्मिक आणि औषधी मूल्य आहे. असे म्हटले जाते की, ‘जेथे तुळशी मायी वास्तव्य करतात तेथे सुख, शांती आणि आर्थिक उन्नती स्वतः येते. शतकानुशतके तुळशीची लागवड भारतात केली जात असून आयुर्वेदात त्याचे मोठे स्थान आहे. आयुर्वेदिक औषधीत तुळशीची पाने, बियाणे आणि वाळलेली मुळे वापरली जातात.

सर्व प्रकारच्या हवामानात तुळशीची लागवड करता येते. हे सर्व देशांमध्ये केले जाऊ शकते. बाळूई, चिकणमाती ज्यामध्ये पाण्याचा निचरा योग्य रित्या होतो तिथे तुळशीचे उत्पन्न घेता येते. 5 ते 8 च्या पीएच मूल्यांसह ही माती उत्पादनासाठी चांगली मानली जाते. तिच्या पेरणीची वेळ मे ते जून पर्यंत असते. तसे, हिवाळ्याच्या हंगामाशिवाय वर्षाच्या कोणत्याही वेळी लागवड करता येते.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/KzJiHgVregE3FOlwpDTyW6