Bajarbhav News: निर्यातीमुळे गहू, सरकी ढेपच्या भावात वाढ; हरभरा अन् सोयाबीनच्या दरात मात्र चढ-उतार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामामुळे शेतकरी बाजारपेठेत (Bajarbhav News) बियाणे व खत खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करत आहेत. गहू, बाजरी, सोयाबीन, मका, सरकी ढेप या वस्तुमालांचे दर तेजीत असून ज्वारी, तूर, हरभरा, सोने चांदीचे दर घसरले आहेत (Bajarbhav News).

आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून देशातील गहू दरात (Wheat Rate) मोठी वाढ पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि युक्रेन हे देश जागतिक गहू उत्पादनात आघाडीवरील देश (Wheat Producing Countries) आहेत. मात्र, प्रमुख गहू निर्यातदार देश असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये यावर्षी गहू उत्पादनात मोठी घट नोंदविली गेली आहे (Bajarbhav News).

ज्याचा थेट परिणाम जागतिक गहू उत्पादनावर (Wheat Production) झाला असून, कमी उत्पादना अभावी दरात तेजी पाहायला मिळत आहे. परिणाम स्वरूप, भारतात देखील काही काळापासून गहू दरात तेजी पाहायला मिळत आहे (Bajarbhav News).

जालना बाजारपेठेत (Jalana Bajar) गव्हाचे दर 2400 ते 4000 रुपये प्रति क्विंटल असे आहेत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार दिसून आले (Bajarbhav News).

काही ठिकाणी बाजारात 50 रूपयांपर्यंतची तेजी आली होती, तर अनेक ठिकाणी बाजार स्थिर होता.

सोयाबीनचे दर (Soybean Rate) सरासरी 4 हजार 100 ते 4 हजार 500 रूपयांच्या दरम्यान आहेत.

मागील बऱ्याच दिवसांपासून सरकी ढेपचे भाव घसरलेले होते. मात्र, सरत्या आठवड्यामध्ये त्यात 100 ते 150 रूपयांची तेजी बघायला मिळाली. सरकी ढेपचे सध्याचे दर 3100 ते 3300 रुपये प्रति क्विंटल आहे.

कापसाच्या दरातही (Cotton Rate) 300 ते 500 रूपयांची वाढ झाली. कापसाचे दर 7000 ते 7600 रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

ज्वारीचे भाव (Jowar Bajarbhav) मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन चांगले आल्याचे व्यापारी सांगत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी उत्पादन कमी राहिल्याचे कळवत आहेत, पण बाजारातील आवक वाढल्यानंतर ज्वारीतील तेजी कमी झाली (Bajarbhav News).

ज्वारीला मागील काही आठवड्यांपासून 2 हजार 300 ते 3 हजार 500 चा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस असेच स्थिर राहू शकतात. त्यानंतर ज्वारीच्या दरामध्ये मोठी तेजी येण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

जालना बाजारपेठेतील बाजारभाव (कंसात दररोजची आवक) (Bajarbhav News)

गहू (400 पोते)2500 ते 3300 रुपये प्रति क्विंटल
ज्वारी (1300 पोते)2000 ते 3500 रुपये प्रति क्विंटल
बाजरी (250 पोते)2100 ते 2500 रुपये प्रति क्विंटल
मका (50 पोते)2250 ते 2550 रुपये प्रति क्विंटल
तूर (100 पोते)9000 ते 11500 रुपये प्रति क्विंटल
हरभरा (100 पोते)5500 ते 6500 रुपये प्रति क्विंटल
मूग (आवक नाही)7000 ते 8000 रुपये प्रति क्विंटल
सोयाबीन (1500 पोते)4100 ते 4450 रुपये प्रति क्विंटल