हॅलो कृषी ऑनलाईन : कुसुम सोलर पंप योजना माजी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज १४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २:०० वाजल्यापासून ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. मात्र या योज़नेच्या संदर्भांत अनेक डुप्लिकेट ,फसव्या वेबसाईटस बनवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. तर अश्या अनेक बनावट वेबसाइट पासून सतर्क राहा. त्यापैकी काही बनावट वेबसाइट्स * .org, * .in, * .com अशा डोमेन नावांमध्ये नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana . com म्हणूनच पंतप्रधान-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकारऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना राबविली जात आहे. “योजनेच्या अधिक तपशीलांसाठी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (MNRE) www.mnre.gov.in किंवा 1800-180-3333 टोल फ्री नंबर डायल करा” अशी सूचना देण्यात आली आहे.