हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 2022-2023 चा अर्थसंकल्प संसदेत सादर करीत आहेत. यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय असणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असताना शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याकडे सरकर प्रयत्नशील असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हंटले आहे.
कृषीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर
देशात कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनचा यात समावेश आहे. हे कृषी ड्रोन्स पिकांची पहाणी करणे, जमीनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे आहेत. कृषी आणि पिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे, असं अर्थमंत्री म्हणाल्यात.
सिंचनासाठी 44 हजार 605 कोटी रुपयांची तरतूद
खरीप आणि रब्बी पिकांसाठी देण्यात येणाऱ्या मदतीमधून एक कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 9 लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी 44 हजार 605 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असंही अर्थमंत्री म्हणाल्या. लघु उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विकास करता यावा त्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावं म्हणून विशेष अनुदान दिलं जाणार आहे.
कृषी विद्यापीठांना निधीची तरतूद
कृषी विद्यापीठांच्या मदतीने थेट शेतकऱ्यांपर्यंत सेंद्रिय शेती आणि त्याचे लाभ उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. यात विद्यापीठांचा मोठा वाटा असल्यामुळे राज्य सरकारने प्रति विद्यापीठास 5 कोटीचा निधी दिलेला आहे. सेंद्रीय शेतीबाबत राज्य सरकार अनुकूल आहे. शास्त्रीय अभ्यास आणि योग्य त्या शिफारसी असणे गरजेचे आहे. विद्यापीठातील अहवालामुळे सेंद्रिय शेतीला गती येऊ शकते.