Weather forecast : `या´ तारखेपासून राज्यात जोरदार पावसाची शक्यता; पंजाब डख यांचा हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज (Weather forecast) व्यक्त केला आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीन व उडीद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र काढणीच्या वेळी पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन व उडीद पीक काढणीस आले आहे.

2 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता (Weather forecast)

ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन व उडीद पीक काढणीस आले आहे, अशा शेतकऱ्यांनी दि. 18 सप्टेंबर पासून ते दि. 20 सप्टेंबर पर्यंत पिकाची काढणी करून शेतीची कामे आटपून घ्यावी. कारण राज्यात दि. 21 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खान्देश, मराठवाडा विभागात दि. 2 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा धरण 100 टक्के भरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.