शेतकरी मित्रानो ! मूळचे मेक्सिकन असलेल्या ‘या’ पिकाच्या शेतीतून एकरी 6 लाख रुपये कमावण्याची संधी

Chia Seeds
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आधुनिक जीवनशैलीमध्ये चंगल्या आणि सकस आहाराचे महत्व वाढत आहे. सब्जाच्या बियांसारखे दिसणारे चिया सीड्सना डाएट कॉन्शिअस लोकांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. चिया बियाणे या पिकाला सुपर फूड मानले जाते.साल्व्हिया हिस्पॅनिका हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. हे प्रामुख्यानं फुलांचं रोप आहे. चिया बियाणे हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. गेल्या काही वर्षांपासून चिया बियाण्याची लागवड भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यासह इतर काही भागात शेतकरी त्याची लागवड करत आहेत. हळूहळू त्याचा विस्तार इतर राज्यांतही होत आहे. अधिक नफा आणि कमी खर्चामुळे चिया बियाण्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. भारतातील कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थान व्यतिरिक्त इतर अनेक राज्यांतील शेतकरी याची लागवड करत आहेत.

लागवड

–चिया बियाणे लागवड पूर्णपणे सेंद्रिय आणि सोपी आहे.
–याची पेरणी दोन प्रकारे केली जाते.
–सुमारे एक ते दीड किलो बियाण्याची फवारणी तंत्राद्वारे एक एकर शेतात पेरणी करता येते.
–दुसरी पद्धत म्हणजे रोपं तयार करुन त्याची लागवड करणे. प्रथम रोपवाटिकेत बियाण्याद्वारे रोप तयार करता येतात.
–त्यानंतर भातासारखी याची लावणी केली जाते. या पद्धतीत लावणी केल्यावर एक एकरात अर्धा किलो बियाणे वापरले जाते.
–फवारणीच्या पद्धतीमध्ये कष्ट कमी आणि बियाणं जास्त लागते. तर, लागण पद्धतीतं ज्यादा श्रम करावं लागतं.

तापमान आणि जमीन

–चिया बियाणे पिकाच्या लागवडीसाठी मध्यम तपमान आवश्यक असतं.
–थंड हवामान आणि डोंगराळ भाग वगळता संपूर्ण भारतात त्याची लागवड करता येते.
–कृषी तज्ञांच्या माहितीनुसार चिया बियाणेचे उत्पादन तपकिरी मातीत चांगले होते.
–चिया बियाण्यांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी शेताची चांगली मशागत करण्याची गरज असते.
–लागवडीपूर्वी पहिल्यांदा दोन किंवा तीन वेळा नांगरणी करून माती बारीक घ्यावी लागते.
–चांगल्या उगवणीसाठी पेरणीपूर्वी शेताला चागंली घात असणं आवश्यक आहे.
–चिया बियाण्यांच्या पेरणीसाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिना ही चांगली वेळ समजली जाते.
–चांगल्या उत्पादनासाठी खुरपणी आवश्यक असते. किमान दोनदा तण काढणे आवश्यक आहे.
–चिया बियाणे पीक 110 ते 115 दिवसात तयार होते.
–चिया बियाणे लागवडीसाठी सिंचनाची विशेष गरज नसते.
–याची रोप फार कमजोर असतात. शेतात पाणी साचल्याने ते तुटण्याची भीती असते.
–पाण्याचा चांगला निचरा असलेली जमीन चिया बियाण्याच्या लागवडीसाठी अधिक चांगली मानली जाते.

काढणी

चिया बियाणे वनस्पतीस एक विशेष वास असतो. याच्या पानांवर केस वाढतात. यामुळे प्राणी त्यापासून दूर राहतात आणि पिकाला हानी पोहोचवत नाहीत. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही. कापणी आणि काढणीच्यावेळी पीक उपटून काढले जाते, यानंतर ते वाळवले जाते आणि नंतर मळणीद्वारे बियाणे वेगळे केले जातात. चिया बियाणे लागवडीने एक एकरातून सरासरी 5 ते 6 प्रति क्विंटल उत्पादन घेता येते, असं शेती करणारे शेतकरी सांगतात.

विक्री

चिया बियाण्यांची किंमत सध्या 1000 रूपये आहे, अशा परिस्थितीत एकरात 6 लाख रुपयांची कमाई शेतकऱ्यांना करता येते. चिया बियाणे विकायला बाजारात जाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगतात. लागण केल्यानंतर याची माहिती शेतकऱ्यांनी कंपन्यांना दिली तर त्यांचे एजंट शेतातून खरेदी करतात. वेगवेगळ्या कंपन्या चिया बियाणे वेगवेगळ्या दराने खरेदी करतात.