हॅलो कृषी ऑनलाईन: बऱ्याच ठिकाणी कपाशीच्या शेतामधील झाडे (Cotton Para Wilt Disease Management) अचानक जागेवरच सुकू लागलेली आहेत, यालाच ‘आकस्मिक मर’ रोग असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर रोगामध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण (Water Stress) पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर 36-48 तासात आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात (Cotton Para Wilt Disease Management) त्यामुळे उत्पादनात मोठे (Cotton Production) नुकसान होऊ शकते.
आकस्मिक मर रोगाचा (Cotton Para Wilt Disease Management) प्रादुर्भाव दिसताच पुढील प्रमाणे व्यवस्थापन करण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील (VNMKV Parbhani) कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ यांनी केले आहे.
कपाशीवरील आकस्मिक रोगाचे व्यवस्थापन (Cotton Para Wilt Disease Management)
- जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा (Water Drainage) करावा.
- वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
- लवकरात लवकर 200 ग्रॅम युरिया + 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत) + 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी.
- किंवा 1 किलो 13:00:45 + 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड 200 लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली आळवणी करावी.
- द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.
महत्त्वाची सूचना: वरील सर्व उपाय योजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे 24 ते 48 तासाच्या आत कराव्या जेणेकरून पुढे होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.
अधिक माहितीसाठी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दूरध्वनी क्रमांक 02452-229000 किंवा विद्यापीठाचा व्हाट्सॲप क्रमांक 8329432097 यावर संपर्क करावा.