हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यवसायासोबतच पशुपालन (Cow Breeds) हा व्यवसाय महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. यामध्ये मुख्यतः गाई, म्हशींचे पालन केले जाते. भारतात गायींच्या जवळजवळ 26 जाती आहेत. यामध्ये साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या गायी सर्वोत्कृष्ट समजल्या जातात. या गायींपासून शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळते. यामुळे शेतकरी त्यांच्या संगोपनातून दूध उत्पादन करत मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण महाराष्ट्रातील पाच प्रमुख गायींच्या जातींबद्दल (Cow Breeds) जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख गायींच्या जाती (Cow Breeds In Maharashtra)
देवणी गाय : महाराष्ट्रात लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड, परभणी जिल्ह्यात ही गाय आढळून येते. डांगी व गिर यांच्या एकत्रित संकरातून (Cow Breeds) तयार झालेल्या या गाईला मराठवाड्याचे भूषण असे म्हणतात. ही गाय दिवसाला 6 तर 7 लिटर दूध सहज देत असून, एका वेतात 636 ते 1230 किलोग्रॅम एवढे दूध उत्पादन देते.
खिल्लार गाय : महाराष्टात ही गाय सोलापूर, सातारा, पुणे व कोल्हापूर येथे प्रामुख्याने आढळते. ही गाय प्रति वेताला 900 ते 1000 किलोग्रॅम एवढे दूध देते. ही गाय अत्यंत चपळ, काटक व आकर्षक दिसते.
गवळावू गाय : ही गाय नागपूर व वर्धा जिल्ह्यात आढळत असून, ही गाय दुधासाठी प्रसिद्ध आहे. गवळावू गाय एका वेतात 800 लिटर दूध देते. या गाईपासून मिळणारे बैल हे चपळ व उत्कृष्ष्ट असतात. ही गाय हलक्या बांध्याची व माध्यम उंचीची असूनही जाड कामासाठी उपयुक्त आहे.
डांगी गाय : देशातील ही एक देशी गायीची जात म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश स्थानिक भाषेत हिला सोनखेरी व कलबेरी असेही म्हणाले जाते. डांगी गाईचे नाव डांगपर्वत रांगामधून पडले. सह्याद्री पर्वत रंगांधले हे गोवंश आहे. डांगी या गाई भिजल्या तरी पाणी अंगात मुरत नाही तसेच आजरपण ही येत नाही. हे या जातीच्या गायींचे अति महत्वाचे वैशिष्ठ आहे. डांगी ही जात शरीराच्या आकाराने मध्यम ते मोठी असते. अतिवृष्टीच्या भागात त्यांच्या अनुकूलतेसाठी त्यांच्या त्वचेतून तेल घटक स्राव होतो. ज्यामुळे या जातीच्या गाई अतिवृष्टी सहन करू शकतात.