कुठल्याही सप्लीमेंट शिवाय गायीला घाला ‘हा’ चारा वाढेल दुधाचे उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांची बऱ्याच वेळेस तक्रार असते की त्यांची जनावरे कमी दूध देतात. यामुळे त्यांना मिळणारा नफा फार कमी प्रमाणात मिळतो. तज्ञांचे या बाबतीत सांगणे आहे की, जनावरांना योग्य पद्धतीने आणि पौष्टिक चारा न दिल्यामुळे तसेच व्यवस्थित देखभाल न केल्यामुळे दूध कमी होण्याची समस्या उद्भवते. त्यासाठी पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांना चवळी ची शेती करण्याचा सल्ला देतात. यामागे बरीच कारणे आहेत.

भारतातील शेतकरी शेतीनंतर उत्पन्नाच्या बाबतीत पशुपालन वर अवलंबून आहेत. जास्तीत जास्त ग्रामीण भागांमध्ये पाहिले तर शेतकरी शेतीबरोबर कमीत कमी एक गाय किंवा म्हैस पाळतातच. त्यामुळे गाईंपासून शेणखत शेतासाठी उपलब्ध होते आणि दूध विकून चांगला नफा मिळू शकतो. जेव्हा गाईंची दूध उत्पादन क्षमता कमी होते तेव्हा शेतकरी दूध उत्पादन वाढावे यासाठी सप्लीमेंट चा वापर करतात. परंतु बरेचसे सप्लिमेंट हे आरोग्यासाठी हानीकारक असतात. त्यामुळे जनावरांना नुकसान होऊ शकते. तसेच अशा प्रकारचे दूध सेवन केल्याने माणसांनादेखील आरोग्याला नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकार कडून दुभत्या गाईंना आणि म्हशीनाचवळीचा चारा खाऊ घालावा यासाठी जोर दिला जात आहे.कारणचवळीच्या चाऱ्यामुळे कुठल्याही सप्लीमेंट शिवाय गाईंच्या दूध उत्पादनामध्ये प्रतिदिन सहा ते सात लिटर दूध देण्याची क्षमता वाढू शकते.

–दुसऱ्याचाऱ्यांच्या तुलनेत पचायला सोपा आहे.
–यामध्ये क्रूड प्रोटीन समाविष्ट आहे.
–तसेच चवळीच्या चाऱ्यामध्ये क्रूड फायबर हे तत्व आहे. गाईंना दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मदतगार आहे.

चवळीच्या चांगल्या जाती

जर शेतकऱ्यांना चवळीची लागवड करायचे असेल तर शेतकरी चवळीच्या EC 4216,UPC-287,UPC-5286,GFC-1,GFC-2,GFC-4 या जातींची लागवड करू शकतात.