Crop Loan: पीक कर्जाच्या व्याजावरील रक्कम परत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी!

xr:d:DAFVBEKggOU:1203,j:2354680611738708348,t:24040510
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील (Crop Loan) व्याजाची रक्कम अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. वर्षभर बँकेने शेतकऱ्यांचे (farmers) पैसे वापरले तरीही व्याज देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांकडून कर्जावरील व्याज (Crop Loan Interest) घेतले जाते, तरीही त्यांना त्यांच्या रकमेवर व्याज का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 31 मार्च जवळ येताच शेतकरी कर्जफेडीसाठी धडपड करत असतात. कोणी धान्य विकून तर कोणी दागिने गहाण ठेवून कर्ज फेडतात.

जिल्हा बँकेकडून (District Bank) शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop Loan) शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यावर 6 टक्के व्याज आकारले जाते. 31 मार्चपर्यंत कर्ज फेडल्यास हे व्याज माफ होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

हे व्याज दोन टप्प्यात जमा केले जाते – डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत (3%) आणि केंद्र सरकार (Central Government) व्याज सवलत (3%). मात्र, यासाठी शेतकऱ्यांना अनेक महिने वाट पाहावी लागते.

शेतकऱ्यांनी 2022-23 मध्ये घेतलेले पीक कर्ज व्याजासह 31 मार्च 2023 पर्यंत भरले. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना व्याजाची रक्कम मिळालेली नाही. बँकेने हे पैसे वर्षभर वापरले तरीही व्याज देण्यास टाळाटाळ करत आहे.

2023-24 मध्येही अनेक शेतकऱ्यांनी 30 मार्च किंवा त्यापूर्वी कर्ज भरले. त्यात व्याजाचाही समावेश होता. मात्र, 30 मार्च रोजी सायंकाळी 2023-24 मधील कर्जावर व्याज आकारले जाऊ नये, असे परिपत्रक जिल्हा बँकेने जारी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी भरलेल्या व्याजाची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी होत आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.