Soybean : पावसामुळे वावरातल्या सोयाबीन पिकाचे नुकसान; काय घ्याल काळजी ? जाणून घ्या

Soybean
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पडत असलेल्या पावसामुळे वावरातल्या सोयबीन (Soybean) पिकाचे नुकसान होत आहे. पिकाची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडत आहेत.परिस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकांमध्ये पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे .अशा परिस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा.

कशी घ्याल सोयाबीन पिकाची काळजी ?

१) पाण्याचा निचरा करा

सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे त्यासोबतच चुनखडीयुक्त जमिनीत किंवा पांढरीच्या जमिनीत लागवड केलेल्या ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पिकाला सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली आहे. जमिनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम शेतातून लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा.

२) किडींचा बंदोबस्त

वाफसा परिस्थिती आल्यावर कोळपणी करावी यामुळे पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. काही प्रमाणात व्यवस्थापनही होते. या व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन ची ५० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी. पहिल्या (Soybean) फवारणीने जर सोयाबीनची पाणे हिरवी नाही झाली तर परत आठ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. या पावसामुळे वाणी किंवा पैसा या किडीचा नैसर्गिक रित्या बंदोबस्त होतो.

३) गोगलगायींवर उपाय

सध्याच्या परिस्थितीत गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे अशावेळी शंखी गोगलगायी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायीच्या नियंत्रणाकरिता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगायनाशक २ (Soybean) किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे.