हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या बाजारात अनेक प्रकारच्या तांदळाच्या जाती पाहायला मिळतात. त्यापैकी उकडा तांदूळ हा खाण्यासाठी पौष्टीक समजला जातो. राज्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात तांदळाचे चांगले उत्पन्न घेतले जाते. ब्रह्मपुरीच्या ‘उकडा’ तांदळाला परदेशातून मागणी आलेली आहे.
रोज कमीत कमी ५०० टन तांदूळ परदेशात जात असल्याचे चित्र आपल्या समोर येत आहे जे की या तांदळाची ओळख सात समुद्र पार झालेली आपल्याला दिसून येत आहे.ब्रम्हपुरी च्या या तांदळाचे तसेच ज्याला सातासमुद्रा पार देशातून मागणी येत आहे असे तांदळाचे नाव “उकडा” तांदूळ. उकडा तांदूळ हा ११० जातीच्या धानापासून तयार केला जातो यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्याची चांगलीच ओळख निर्माण झालेली आहे.
ब्रम्हपुरी तालुका मध्ये पाहायला गेले तर जवळपास १५ राईस चे मिल आहे. जे की सध्या तिथे तांदळापासून उकडा तांदूळ या तांदळाचे उत्पादन घेतले जात आहे.रोज उकडा तांदूळ जवळपास ५०० टन परदेशात पाठवला जात आहे जे की त्यामध्ये साऊथ आफ्रिका, दुबई, सिंगापूर, केनिया असे देश सामील आहेत. ब्रम्हपुरी मधील राईस मिल येथे या तांदळाची चांगल्या प्रमाणे निर्मिती केली जाते.आणि नंतर हा तांदूळ चांगल्या प्रकारच्या वजनानुसार त्या त्या पिशवीमध्ये पॅक करतात. उकडा तांदळाच्या पिशव्या तेथून ट्रक द्वारे नागपूर ला जातात, नागपूर हुन रेल्वे द्वारे मुंबई ला जातात आणि तिथून जहाज मध्ये सर्व माल टाकून समुद्रावाटे परदेशात उकडा तांदूळ दाखल होतो.