हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे खरिपातील पिकांत व फळबागांमध्ये वेगवेगळ्या समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे. अशात कृषी विज्ञान केंद्र परभणी च्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांनी अशा वेळी घ्यावयाच्या काळजी संदर्भात सल्ला दिला आहे .
१. फळे, भाजीपाला व फुलपिकामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.
२. काढणी तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करुन घ्यावी.
३. गादी वाफ्यावर लागवड केलेल्या रोपवाटिकेतील रोपांना बुरशीनाशकाची आळवणी करावी.
४. भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास गोगलगाई गोळा करुन साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यामध्ये बुडवुन माराव्यात, गोगलगाईच्या नियंत्रणासाठी दाणेदार मेटाल्डीहाईड २ किलो प्रति एकर याप्रमाणे शेतात पसरुन द्यावे.
अधिक माहितीसाठी संपर्क,
डॉ. प्रशांत भा. भोसले,
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
प्रा. अमित औ. तुपे, विषय विशेषज्ञ,
कृषि विज्ञान केंद्र, परभणी
(९८६०३७०००० )