शेतकऱ्यांनो अतिरिक्त उसाची उचल करायचीय ? मग ‘या’ नंबरवर द्या माहिती ;ऊसप्रश्नी सरकारचे नियोजन

sugercane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्यामुळे मराठवाड्यासारख्या भागातही उसाचा पेरा मोठा झाला आहे. उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. यंदाचा ऊस हंगाम चांगलाच लांबला आहे. सध्याच्या प्रखर उन्हामुळे उसाची चिप्पाड शेतात होत आहेत. लवकरात लवकर उसाचे गाळप व्हावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेने पुढाकार घेतला होता. किती ऊस शिल्लक आहे ? कितीचे गाळप झाले आहे ? नोंद देखील त्यांच्याकडून घेतली गेली होती . साखर आयुक्तांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पाच जिल्ह्यांमध्ये समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी आता हे काम बघणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कुठे साधाल संपर्क ?
आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि राहिलेला ऊस तोडण्यासाठी या अधिकाऱ्याची सगळी माहिती देण्यात आली आहे. त्यांची नवे आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

१)जालना – सुरेश सुपेकर- 9807172727.
२)उस्मानाबाद-सुदाम रोडगे- 9422467894.
३)परभणी- अविनाश हिवाळे- 7972077537.
४)लातूर- कुबेर शिंदे- 9822782145.

5)बीड- व्ही.पी सोनटक्के- 7972486806.

आता या अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपला ऊस किती राहिला आहे, याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. आता ही माहिती गोळा करुन ती साखर आयुक्तांना देण्याची जबाबदारी ही या अधिकाऱ्यांवर आहे. चांगला पैसा हातात येईल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उसाचे पीक घेतले खरे पण उसाची उचल अद्याप न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

संदर्भ : कृषी जागरण