हॅलो कृषी ऑनलाईन: महिलांच्या सक्षमीकरणासाठी (Drone Didi Yojana) मोदी सरकारने देशभरात अनेक योजना (Scheme For Women) राबवल्या आहेत, यातीलच एक योजना म्हणजे ड्रोन दीदी योजना. या योजनेंतर्गत आता महिलांना प्रशिक्षण (Drone Didi Training) आणि 8 लाख रूपयांचे अनुदान (Subsidy) जाहीर करण्यात आले आहे.
महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government Scheme) ‘ड्रोन दीदी योजना’ (Drone Didi Yojana) राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगारा सोबतच सन्मानही मिळत आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकारने अनेक राज्यांतील सुमारे 3 हजार महिला आणि बचत गटांना (Women SHG) ड्रोन पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच या योजनेंतर्गत या महिलांना 8 लाख रूपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कसे मिळवायचे फायदे..
आठ लाख रूपयांचे अनुदान
सध्या देशातील सुमारे 10 कोटी महिला स्वयंसहाय्यता गटांशी संबंधित आहेत. या योजने अंतर्गत देशभरातील 14,500 महिलांना ड्रोन (Agriculture Drone) दिले जाणार आहेत. यासोबतच 8 लाख रूपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत या महिलांना तीन हजार ड्रोन (Drone Didi Yojana) दिले जाणार आहेत.
या तीन राज्यातील महिलांना होणार सर्वाधिक फायदा
या योजनेचा (Drone Didi Yojana) लाभ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महिलांना मिळणार आहे. यासाठी काही निकषही निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांमध्ये जास्तीत जास्त जमीन लागवड योग्य करणे, सक्रिय स्वयं-सहायता गट आणि नॅनो खताचा मोठ्या प्रमाणावर वापर यांचा समावेश आहे.
10 लाखाचे पॅकेज
या पॅकेजमधून महिलांना 80 टक्के अनुदान म्हणजेच 8 लाख रुपये कृषी मंत्रालयाकडून आणि उर्वरित 20 टक्के म्हणजे 2 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे.
योजनेचा काय फायदा होणार?
- या योजने (Drone Didi Yojana) अंतर्गत सरकारकडून ड्रोन उडवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. या
- शिवाय ड्रोन खरेदीसाठी सरकारने सबसिडी आणि कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
- महिला बचत गटांना ड्रोन खरेदीवर अनुदान मिळणार सरकार ड्रोनच्या किमतीच्या 80 टक्के किंवा कमाल 8 लाख रुपये अनुदान सरकार कडून मिळेल. ड्रोनच्या उर्वरित खर्चासाठी AIF कडून कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
- कर्जाची परतफेड नाममात्र 3 टक्के व्याज दराने करावी लागेल. ड्रोनच्या साहाय्याने महिला बचत गट वर्षाला 1 लाख रुपये अतिरिक्त कमवू शकतात.
ड्रोन किटमध्ये काय असेल?
सरकारने दिलेल्या ड्रोनमध्ये ड्रोन बॉक्स, चार अतिरिक्त बॅटरी आणि चार्जिंग हब असेल.
योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळणार?
- ड्रोन दीदी योजनेचा (Drone Didi Yojana) लाभ घेण्यासाठी, तुम्ही स्वयं-सहायता बचत गटाचे सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.
- महिलेने भारतीय नागरिक असणे देखील आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 37 वर्षे दरम्यान असावे.
- योजने अंतर्गत निवडलेल्या महिलांना 15 दिवस ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
- जी महिला ड्रोन दीदी (Drone Didi) म्हणून काम करेल तिला 15,000 रुपये पगार मिळेल.
- 10 ते 15 गावांचे क्लस्टर बनवून महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
- योजनेद्वारे, महिलांचे पगार थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जाईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बचत गटाचे ओळखपत्र