हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो केंद्रातल्या मोदी सरकारने संघटित आणि असंघटित कामगारांच्या नोंदणीकरीता ‘ई -श्रम पोर्टल’ ची निर्मिती केली आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्याने कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. मात्र तुमची जर नोंदणीच नसेल तर मात्र शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही म्हणूनच ही नोंदणी आवश्याक आहे. शेतकरी मित्रानो दोन प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता.
१) ऑनलाईन पोर्टल द्वारे नोंदणी
२) जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन
मात्र नोंदणी करीत असताना काही समस्या उद्भवल्यास तुम्ही मोबाइलवरूनही समस्येचे निराकरण करून घेऊ शकता. त्याकरिता संपर्क कुठे करावा आणि त्याची प्रक्रिया काय आहे याची माहिती करून घेऊया…
1. फॉर्म भरण्यात काही अडचण येत असेल, तर हेल्पडेस्क किंवा टोल फ्री नंबर-14434 वर कॉल करून समस्या मांडता येणार आहेत. .
2. या हेल्पडेस्कवर 9 भाषांमध्ये मदत केली जात आहे. हिंदी किंवा उर्वरित भाषेमध्ये तुम्ही तुमची समस्या विचारू शकता.
3. सोमवार ते शनिवार पर्यंतच या क्रमांकावर कॉल करू शकता. हा क्रमांक टोल फ्री क्रमांक आहे.
4. फोन व्यतिरिक्त, आपण आपली अडचण लिहून काढू शकता, म्हणून आपल्याला GMS.ESHRAM.GOV.IN वर जाऊन नोंदणीदरम्यान आपल्याला असलेल्या समस्येबद्दल पत्र लिहावे लागेल आणि लवकरच आपल्याला यावर तोडगा सांगितला जाईल.