Ethanol Production : मार्च अखेरपर्यंत देशाने गाठला 12 टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा!

Ethanol Production In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादन कमी राहिल्याने, इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंधने घालण्यात आली. केंद्र सरकारने डिसेंबर 2023 या महिन्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली. मात्र असे असतानाही यंदा भारताने इथेनॉल निर्मिती करण्यात मैलाचा दगड गाठला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करताना मार्चअखेरपर्यंत देशाला इंधनात 11.96 टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा (Ethanol Production) गाठण्यात यश मिळाले आहे.

232.56 कोटी लीटर इथेनॉलचे मिश्रण (Ethanol Production In India)

देशात 2023-24 या चालू इथेनॉल पुरवठा वर्षात इंधनात एकूण 232.56 कोटी लीटर इथेनॉलचे मिश्रण झाले आहे. मोलॅसिस-आधारित इथेनॉल उत्पादकांकडून (Ethanol Production), पुरवठा वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत एकूण इथेनॉलचे प्रमाण सुमारे 152 कोटी लिटर होते. आणि पुरवठा केलेले प्रमाण सुमारे 126 कोटी लिटर होते. यापैकी उसाच्या रसापासून इथेनॉलचे एकूण प्रमाण 54.33 कोटी लिटर होते. आणि पाच महिन्यांत एकूण पुरवठा अंदाजे 52 कोटी लिटर होता. बी हेवी मोलॅसेस आणि सी हेवी मोलॅसेसचे एकूण करार केलेले प्रमाण अनुक्रमे 75 कोटी लिटर आणि 23 कोटी लिटर होते. आणि पाच महिन्यांत एकूण पुरवठा अनुक्रमे 63.63 कोटी लिटर आणि 10.75 कोटी लिटर होता. असे इथेनॉल उद्योगाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

धान्यापासून इथेनॉल निर्मितीकडे कल

याशिवाय उसापासून इथेनॉल निर्मिंतीवर बंधने घालण्यात आली. त्यानंतर धान्यापासून इथेनॉल निर्मितीमध्ये प्रामुख्याने दोन तिमाहीत एकूण करार केलेले प्रमाण 168.39 कोटी लिटर आणि पुरवठा 98.21 कोटी लिटर राहिला. यापैकी, खराब झालेल्या अन्नधान्यापासून एकूण उत्पादित प्रमाण 86.61 कोटी लिटर आणि प्राप्त झालेल्या इथेनॉलचे एकूण प्रमाण 47.65 कोटी लिटर होते. असेही इथेनॉल उद्योगाने म्हटले आहे.

224 कोटी लिटर पुरवठा

धान्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी एफसीआयच्या तांदळाच्या पुरवठ्यावर निर्बंध असल्याने तेथून इथेनॉलचा पुरवठा होत नव्हता. मका फीडस्टॉककडे जाताना, पहिल्या दोन तिमाहीमध्ये एकूण करार केलेले प्रमाण 72 कोटी लिटर होते आणि पुरवठा सुमारे 505.6 कोटी लिटर होता. त्यामुळे पहिल्या दोन तिमाहीत धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादक आणि मोलॅसिस-आधारित इथेनॉल उत्पादक या दोघांकडून एकूण इथेनॉलचे प्रमाण 320 कोटी लिटर होते आणि एकूण पुरवठा सुमारे 224 कोटी लिटर झाला आहे. असेही इथेनॉल उद्योगाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.