जळगावच्या अंमळनेरमध्ये पावसाअभावी भीषण स्थिती ; 45हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जळगाव: एकीकडे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील काही भागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. पण अजूनही इथे पावसाचा पत्ता नाहीये. त्यामुळे पिकांनी मान टाकली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चारा देखील मिळत नाहीये. आता पाऊस पडला तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. पण हातची गेलेली पिकं पुन्हा येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने कागदी घोडे न नाचवता तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अमळनेर तालुक्यात भीषण स्थिती

जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात सर्वात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. अमळनेर तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 670 मि.मी. आहे. चालु हंगामात जून महिन्यामध्ये 76.6 मि.मी. व जुलै महिन्यामध्ये 90.8 मि.मी. असे एकुण 167.4 मि.मी. पर्जन्यमान झालेले आहे, म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत 25 टक्केपेक्षा कमी पर्जन्यमान झालेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे सुमारे 70 हजार हेक्टर ऐवढ्या पेरणीयोग्य क्षेत्रापैकी 45हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली आहे.

पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे बळीराज्यावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे बळीराजाचा चालू वर्षाचा खरीप हंगाम पूर्णपणे कोलमडला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अमळनेर तालुक्यात पर्जन्यमान 25 टक्के पेक्षा कमी असल्यामुळे तात्काळ पंचनामे करुन अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. हेक्टरी 25 हजार रुपये प्रमाणे सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात यावे, शेतीपंपाचे चालt वर्षाचे वीज बील माफ करण्यात यावे, गुरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्या, अशाही मागण्या आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात श्रावण महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव जिल्ह्यात घेत आहेत. जिल्ह्यात तापमानाचा पारा चार अंशांनी वाढून 35 ते 36 अंशवर पोहोचला आहे. बाष्पयुक्त हवेमुळे पिकांवरही परिणाम होत असून सर्वत्र पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. श्रावणात पावसाच्या सरीचा अनुभव येतो मात्र नागरिक कडक उन्हाचां अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या दोन दिवसापासून तापमान वाढ झाली असून सरासरी 31 32 अंश असणाऱ्या तापमान 35.6 अंशापर्यंत गेले त्यामुळे उकाड्याने हैराण केले. वातावरणात बाष्पयुक्त हवा सुरू असल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे त्याचा परिणाम पिकावर होऊ लागला आहे. सध्या स्थिती काही शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी पेरणी केली आहे त्यामुळे अशा धोका निर्माण झाला आहे.