Farmer Success Story: काश्मीरच्या शेतकर्‍याची कमाल, व्हर्टिकल फार्मिंग द्वारे घेतले ‘शाली’ तांदळाचे उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: काश्मीरमधील कुलगाम येथे राहणारे जहूर अहमद ऋषी (Farmer Success Story) यांनी व्हर्टिकल फार्मिंग द्वारे चक्क तांदळाचे उत्पादन (Rice Production) घेतले आहे.

व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) ही शेतीची पद्धती जपान आणि चीनमध्ये फार पूर्वीपासून वापरण्यात येत आहे. शेतीच्या या नव्या तंत्राद्वारे (Farmer Success Story) कमी जागेत जास्त पीक घेता येते.

देशातील वाढत्या लोकसंख्येसोबत शेत जमीनही कमी होत असून ही समस्या कृषी शास्त्रज्ञांसमोर सर्वात मोठे आव्हान बनत आहे. हे लक्षात घेऊन दक्षिण काश्मीरच्या (Kashmir) कुलगाम मधील कृषी शास्त्रज्ञांनी (Agriculture Scientist) एक उपक्रम सुरू केला आहे, जेणेकरून कमी जागेत शेती करता येईल.

गेल्या वर्षी जहूर अहमद ऋषी यांनी घराच्या छतावर भाताचे पीक घेऊन (Farmer Success Story) सर्वांना आश्चर्य चकित केले होते, परंतु आता जहूर अहमद ऋषी यांनी व्हर्टिकल फार्मिंग द्वारे भात पिकांचे उत्पादन घेतले आहे. यापद्धतीद्वारे पिकांचे उत्पादन चौपट करण्याचे (Farmer Success Story) त्यांचे ध्येय आहे.

काश्मीरमधील कृषी शास्त्रज्ञ डॉ. कौसर मुकीम सांगतात की, या पद्धतीमुळे जमिनीची कमतरता असूनही कमी जागेत अधिक कृषी उत्पादन घेता येईल कारण येणाऱ्या काळात लोकसंख्या वाढल्याने शेतीसाठी जमीन कमी होईल. लोकसंख्या कमी करणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीसाठी (Modern Agriculture Technique) मोठी मदत होईल.

दक्षिण काश्मीरमधील (Farmer Success Story) कुलगाम येथील दोन कृषी शास्त्रज्ञ यांनी वर्षभरात शाली (तांदूळाचा एक प्रकार) दोन पिके घेण्याचे काम करत आहेत. काश्मीर मध्ये साधारणपणे शालीचे पीक (Shali Rice) वर्षातून एकदाच घेतले जाते, परंतु कृषी शास्त्रज्ञ वर्षातून दोन वेळा शालीचे पीक (Farmer Success Story) घेण्याचा प्रयोग करत आहेत.

शाली तांदूळ माहिती (Shali Rice)

शाली ही सुवासिक तांदळाची (Fragrant Rice) जास्त किमतीची जात आहे. ही जात मुश्कीबोदजी नावाने सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. शाली तांदूळ, ज्याला शास्तिक शाली असेही म्हणतात, हा एक प्रकारचा पॉलिश न केलेला तांदूळ आहे जो पेरणीनंतर 60 दिवसांत कापला जातो. हा तांदूळ लालसर तपकिरी रंगाचा असून आयुर्वेदातील सर्वोत्तम धान्यांपैकी एक मानले जाते. शास्तिक हे नाव संस्कृत शब्द 60 पासून आले आहे

शाली तांदूळ आयुर्वेदात फक्त अन्न म्हणूनच नव्हे तर औषध (Medicine Purpose) म्हणूनही वापरले जाते. या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो आणि त्यात भरपूर फायबर असतात. त्यात सुमारे 16.5% प्रथिने, 26-32% थायामिन, 4-24% रियाबोफ्लेविन आणि 2-36% नियासिन देखील आहे. शाली तांदळाचा शरीरावर कार्सिनोजेनिक प्रभाव असतो आणि शास्तिक शाली पिंडा स्वेदासाठी पंचकर्म उपचारामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.