हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना तातडीने मदत (Help To Farmers Heir) देण्यासाठी निधी वितरित (Disbursement Of Funds) करण्याबाबत शासन निर्णय आला आहे.
नापिकी, कर्जबाजारीपणा (Indebtedness) व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या (Farmers) वारसांना तातडीने मदत देण्यासाठी सहाय्यक अनुदानापोटी आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या वारसांना वित्तीय सहाय्य देण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षात सर्व विभागीय आयुक्त यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येत आहे.
तसेच सन 2024-25 या आर्थिक वर्षात शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधणे शक्य नसल्याने निधी आहरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्यांच्या (Farmer Suicide) प्रकरणांत विहित कार्यवाही तातडीने पूर्ण करून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना मदत देण्यात यावी.
या प्रयोजनासाठी होणारा खर्च आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या वारसांना वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तात्काळ सादर करावे. असे आदेश विभागीय आयुक्त स्तरावर देण्यात आले आहेत.
विभागानुसार वितरीत करण्यात येणारी रक्कम
विभागीय आयुक्त तथा नियंत्रक अधिकारी | वितरीत अनुदानाची रक्कम (रूपये लाखात) |
कोकण | 1.33 |
पुणे | 44.67 |
नाशिक | 197.67 |
औरंगाबाद | 155.33 |
अमरावती | 197.33 |
नागपूर | 63.67 |
एकूण | 660.00 |