हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी पीक पेरा, सातबारा अशा महत्वाच्या घटकांच्या नोंदणीसाठी नवीन ई- पीक पाहणी ऍप १५ ऑगस्ट ला लॉन्च केले आहे. या ऍपवर आतापर्यंत राज्यातल्या ७७ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही तुम्ही तुमची ई- पीक नोंदणी केली नसेल तर या लेखात नोंदणी करण्याच्या सोप्या स्टेप्स आम्ही सांगणार आहोत…
स्टेप -१
–सर्वप्रथम मोबाईल मधील गुगलप्लेस्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.पिक पेरणी ची माहिती सदरामध्ये तुमच्या जमिनीचा भूमापन क्रमांक /सनं/ गट क्रमांक निवडावा.
स्टेप -२
–जेव्हा तुम्ही तुमच्या गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे व पोट खराब क्षेत्राबद्दल सर्व माहिती दर्शवली जाईल.
हंगाम निवडा मध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्षापैकी हंगाम निवडू शकतात.पिक पेरणी साठी उपलब्ध क्षेत्र दर्शवली जाईल.
स्टेप -३
–पिकांच्या वर्गामध्ये एक पिक पद्धती, मिश्र पीक,पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस पिक,पडीत क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा.जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पिकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम काय पड जमिनीची नोंदणी करावी.पिकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भिड पिकाचा प्रकार, फळ व फळपीक पर्याय दिसतील. यापैकी योग्य तो पर्याय निवडावा.
स्टेप -४
–पीक पर्याय निवडून शेतातील पिकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंदणी करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळझाडांची संख्या व क्षेत्र नमूद करायला.
मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकानेव्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूणक्षेत्रापेक्षा जास्त होऊ नये.
स्टेप -५
–चालू हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळीचालू पडक्षेत्र निवड करावे.
जल सिंचनाचे साधन पर्याय खाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनांचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडावा.
त्यानंतर सिंचन पद्धत निवडायचे आहे.ठिबक सिंचन, तुषार सिंचन,प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.
शेतकरी या ठिकाणी पिक पेरणी केलेला / लागवड केलेल्या पिकाचा दिनांक नमूद करतील