Farmers Success Story: सव्वाशे वर्षे जुनी वडिलोपार्जित शेती पद्धतीद्वारे पशूंचा धोरणात्मक वापर करून शेतकरी करतो पाचपट कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पश्चिम (Farmers Success Story) गोदावरी जिल्ह्यातील सीतामपेटा गावी राहणारे सतीश बाबू गड्डे (Satish Babu Gadde) हा शेतकरी 1900 मध्ये त्यांच्या पूर्वजांनी सुरू झालेली 124 वर्षांची शेतीची परंपरा यशस्वीरीत्या पुढे नेत नफ्याची शेती करत आहेत. त्यांच्या पूर्वजांनी सुरु केलेली ही शेती पद्धती म्हणजे “पशुधन-आधारित शेती” (Cattle-Based Agriculture). ही पद्धत पशुधन आणि माती यांच्यातील सहजीवन यावर भर देते तसेच शाश्वत आणि उत्पादक शेती पद्धती सुनिश्चित करते. या शेतीतून सतीश बाबू वर्षाला लाखोचा नफा कमवत आहे. सतीश बाबू यांनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पशु-आधारित शेती करणारी ही त्यांच्या कुटुंबातील चौथी पिढी आहे (Farmers Success Story).

पशुधन आणि माती आहे शेतीचे जीवन आहे

शेतीसाठी पशुधन महत्वाचे आहेत असे सतीश यांना वाटते. त्यांच्या मते  पशु आणि माती एकमेकांना पूरक आहेत. गुरांचे शेण आणि मूत्र जमिनीची सुपीकता भरून काढतात, तर जमिनीत उगवलेली चारा पिके पशुंना अन्न पुरवतात.ही एक सिद्ध पद्धत आहे ज्यामुळे त्याच्या कुटुंबाची शेती एका शतकाहून अधिक काळ टिकून आहे (Farmers Success Story).

त्याच्या 52 एकर शेतीचे सतीशने तीन भाग केले आहेत: एक भागात भात (Paddy Farming) लागवड, दुसऱ्या भागात मका (Maize Farming) आणि तिसऱ्या भागात नारळाची शेती (Coconut Farming) केली जाते. त्यांची पीकपद्धती एकाच असली तरी आधुनिक आणि पारंपारिक शेती तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करून नफा दुप्पट करण्यात ते यशस्वी (Farmers Success Story) झाले आहेत.  

भात आणि मका: सतीश जून ते नोव्हेंबर पर्यंत भात पिकवतो. भाताची कापणी केल्यावर, ते मक्याची लागवड करतो. पुढच्या पेरणीच्या हंगामापर्यंत बाकी जमिनीत गुरांसाठी चारा पिकांची लागवड करतात. प्रत्येक 75 किलो धानापासून ते 62 किलो तांदूळ काढतात एवढे त्यांचे नियोजन सूक्ष्म आहे. इतर शेतकरी फक्त सरासरी 45 किलो एवढेच तांदूळ काढतात. ही उल्लेखनीय कार्यक्षमता पारंपारिक शेती पद्धतींचे अवलंबन यामुळे प्राप्त झालेली आहे असे त्यांना वाटते (Farmers Success Story).

नारळ शेती: सतीश 16 एकर जमिनीवर केवळ नारळ शेती करत आहेत. यामागे त्यांचा दृष्टीकोन असा आहे की गुरांना नारळाच्या झाडांना बांधल्यामुळे शेण आणि मूत्र यामुळे नारळाच्या झाडाच्या  मुळांभोवतीची माती नैसर्गिकरित्या सुपीक होते. या पद्धतीमुळे प्रति झाड दरवर्षी 240-270 नारळांचे उत्पादन मिळते. जे कोकोनट बोर्ड ऑफ इंडियाने नोंदवलेल्या 170 नारळापेक्षा जास्तआहे. नारळ बागेत आंतरपीक घेत नसल्यामुळे नारळाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढते. व्यापारी स्वेच्छेने त्यांच्या बाहेतील नारळे 2 रु. अधिकच्या भावाने खरेदी करतात (Farmers Success Story).

नाविन्यपूर्ण शेती तंत्राचे फायदे

सतीशच्या शेतीच्या पद्धती केवळ पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त नाहीत, तर ते आज कृषी क्षेत्रातील काही सर्वात गंभीर आव्हाने देखील हाताळतात (Farmers Success Story) जसे

रोग प्रतिबंध: गुरांना शेडमध्ये ठेवण्याऐवजी शेतात मुक्तपणे फिरू देतात त्यामुळे, पशुतील स्तनदाह सारख्या रोगांच्या प्रसाराला आळा बसतो. भारतात, दरवर्षी या रोगामुळे सुमारे 27% गुरे मरतात, परंतु या तंत्राचा वापर करून, ही संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो असे सतीश सांगतात.नैसर्गिक

तणनियंत्रण: गुरांच्या नियमित हालचालीमुळे त्यांचे मूत्र एकसमानपणे शेतात वितरीत केले जाते, जे नैसर्गिक तणनाशक म्हणून काम करते. हे केवळ तणांवर नियंत्रण ठेवत नाही तर हानिकारक रासायनिक तणनाशकांची गरज देखील काढून टाकते, ज्यामुळे त्याचे शेत अधिक पर्यावरणपूरक बनते.

जलसंधारण: सतीशची पीक व्यवस्था कमीत कमी पाण्याची गरज म्हणून तयार करण्यात आली आहे, जी कमीपाण्याच्या प्रदेशांसाठी विशेष फायदेशीर आहे. सरकार अनुदानित पाणी पुरवते, पण सतीशच्या पद्धतींमुळे त्याच्या शेतात पाणी कार्यक्षमतेने वापरले जाते. त्याची गुरे चरत असताना, जमिनीत नैसर्गिकरीत्या वायुवीजन करण्यास मदत करतात, ज्यामुळे बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा ह्रास कमी होऊन जमिनीत ओलावा टिकवून ठेवता येतो.

पर्यावरणीय स्वच्छतेची वचनबद्धता: सतीशची शेती भारताच्या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेच्या स्वच्छ भारत तत्त्वांशी जुळवून घेणारी आहे. माती, पाणी आणि हवा यांची स्वच्छता राखण्यात गुरेढोरे महत्त्वाची भूमिका बजावतात,. “जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाच घटकांपैकी, गुरे तीन गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात असे सतीश सांगतात.

शाश्वतता आणि समृद्धीचे चक्र: सतीशची बांधिलकी त्याच्या पशुपालनाच्या पद्धतीवरून दिसते. तेथे वासरांना त्यांच्या मातांसोबत नैसर्गिकरित्या वाढवले ​​जाते, जे त्यांना मजबूत प्रतिकारशक्ती विकसित करण्यास आणि निरोगी वाढीस मदत करते. दरवर्षी, त्याच्या शेतात सुमारे 11-12 नवजात वासरांचे जन्म होते. वृद्ध गुरांची विक्री, करून त्यांना अधिकचे उत्पन्न मिळते. ज्यामुळे ते शेतीचे कामकाज आणि विस्तार अधिक सक्षमपणे करू शकतात.

उत्पन्न आणि नफा (Farmers Success Story)

सतीशचे उत्पन्न इतर शेतकर्‍यांच्या तुलनेत पाचपट अधिक आहे असे त्यांना वाटते. कारण ते 100 रू. प्रति किलो दराने तांदूळ विकून प्रति एकर जवळपास 97,200 रुपये कमावतात.  शिवाय, नारळापासून प्रति झाड 340-350 रुपये याप्रमाणे अंदाजे 17,000 रुपये कमावतात. शिवाय, प्रति पशु विक्रीतून  80,000 रू. याप्रमाणे वर्षाचे 4 लाख रू. उत्पन्न कमावतात. अशाप्रकारे त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 60 लाख रू. पेक्षा जास्त आहे.

सतीशचे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. पशुंचा धोरणात्मक वापर करून जमिनीची सुपीकता सुधारण्यावर आणि पीक उत्पादनात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करून इतरांच्या शेतात आपल्या पद्धतींचा विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. भारताच्या समृद्ध कृषी वारसाचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यात मदत करणे व हे त्यांचे ज्ञान इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे (Farmers Success Story).