Farmers Success Story: अचूक वेळ साधत केली शेती; ‘काकडी किंग’ म्हणून मिळवली ख्याती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पुणे जिल्हा, मंचर तालुका, थोरातमळा येथील शेतकरी (Farmers Success Story) सखाराम विठोबा थोरात यांनी 30 गुंठे क्षेत्रात काकडी पिकाची लागवड (Cucumber Farming) करून कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे उत्पादन कसे काढता येते याचा आदर्श सभोवतालच्या परिसरामध्ये दाखवून दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी नियंत्रित पद्धतीने काकडीची शेती (Controlled Farming) करून लाखो रूपयांचे उत्पादन मिळवले आहे (Farmers Success Story).

उन्हाळी हंगामाच्या शेवटी काकडीची आवक कमी असते. त्यामुळे वाढलेल्या दराची संधी साधण्यासाठी काकडीचे थेट बियाणे लावले तर उन्हामुळे उगवण्याचे प्रमाण कमी, तर मरतूक जास्त होते. यामुळे रोपांचा दर्जा चांगला पाहून योग्य असे रोपांची लागवड (Seedling Planting) केल्यास उत्पादन वाढीस मदत होते असे थोरात म्हणाले (Farmers Success Story) .

असे केले पिकाचे नियोजन

पूर्वी सरी पद्धतीने पीक घेतले जायचे. आता ते बेडवर घेतले जाते. पिकाला पाणी भरपूर म्हणजे एक दिवस आड लागते. या भागात बोअरवेल्स तसेच घोड नदी असल्याने पाण्याची सोय चांगली आहे.

मल्चिंग पेपरचा (Mulching Paper) वापर केल्यामुळे खुरपणीचा खर्च वाचला, पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले, पिकाचा जोम वाढला तसेच काकडीला तजेलदारपणा आला.

थोरात यांनी सुरुवातीला चांगली नांगरणी केली. सेंद्रिय खताचा वापर केला. त्यावर काकडीचे रोप एप्रिल महिन्यात लावले. नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात काकडीची शेती फुलली. वेलीला जागोजागी काकड्याही लागल्यात.

काकडीची लागवड करताना कोंबडखत (Poultry Manure) 60 बॅग आणि 10:26:26 सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micro Nutrients)  असा रासायनिक खताचा बेसल डोस टाकला. मल्चिंग पेपर वापरून लागवड केली. त्यामध्ये त्यांनी तार काठी वापरून चांगल्या प्रतिच्या काकडीचे उत्पादन (Cucumber Production) घेतले.

वेळोवेळी बिरोबा शेती भांडारचे चालक नवनाथ थोरात यांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशक बुरशीनाशक यांची फवारणी व ड्रीप खतांचा वापर करून भरघोस उत्पादन घेतले,

काकडी विक्रीसाठी किसान कनेक्ट अॅग्रो मॉल कळंब येथे पाठवण्यात येत आहे.

काकडी लागवडीतून उत्पन्न (Farmers Success Story)

20 किलो कॅरेटला सरासरी 700 रुपये भाव मिळाला, काकडी तोडा चालू होऊन 20 दिवस झाले आहेत. मशागत, बियाणे, खते, मल्चिंग पेपर आणि मजुरी मिळून साधारण 80 हजार रुपये खर्च झाला आहे.

छोट्या पिकात बाजारभाव मिळाला आणि उत्कृष्ट दर्जेदार पीक आले तर चांगली कमाई होते हे  सखाराम थोरात (Farmers Success Story) यांनी सिद्ध केले आहे.