Farmers Success Story: सातारचा शेतकरी, आवळा उत्पादनातून झाला लखपती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांना (Farmers Success Story) सर्वात जास्त सतावणारा दुष्काळ कधी कधी शेती सोडायला भाग पाडतो, परंतु काही शेतकरी (Farmers) असे सुद्धा आहेत जे दुष्काळावर मात करून पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आपल्या शेतात फळबागा फुलवतात. अशाच एका शेतकर्‍याची यशोगाथा (Farmers Success Story) आज आपण जाणून घेणार आहोत.   

सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण तालुका हा दुष्काळी (Drought Area) पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु याच दुष्काळी पट्ट्यातलं धुमाळवाडी (Dhumalvadi) हे गाव संपूर्ण राज्यात फळबागांसाठी प्रसिद्ध आहे (Farmers Success Story). इथल्या शेतकरी बांधवांनी दुष्काळावर मात करून पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आपल्या शेतात फळबागा फुलवल्या आहेत. गावात जवळपास 19 हून अधिक फळबागा आहेत, म्हणूनच उंच डोंगरांमध्ये वसलेल्या या धुमाळवाडी गावाला ‘फळांचं’ गाव (Fruit Village In Maharashtra) म्हणून ओळखलं जाते.

धुमाळवाडीतल्या शेतकर्‍यांनी वेगवेगळ्या फळांची लागवड आपल्या बागेत केली आहे (Farmers Success Story). इथं अगदी तैवान पिंक पेरू, डाळिंब, सिताफळ, रामफळ, केळी, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, द्राक्ष, चिकू आणि संत्र्यांसह विविध फळांचा घमघमाट असतो. याच धुमाळवाडीतील प्रगतशील शेतकरी दत्तात्रेय धुमाळ (Dattatreya Dhumal) यांनी आपल्या सव्वा एकर क्षेत्रात आवळ्याची लागवड केली आहे, यातून त्यांना लाखो रुपयाचे वार्षिक उत्पन्न मिळते (Farmers Success Story).

धुमाळ कुटुंब पिढ्यानुपिढ्या शेती आणि फळ लागवड करत आहेत. त्यांनी आपल्या शेतजमि‍नीत अनेक फळबागांची लागवड (Fruit Crop Cultivation) केली. दत्तात्रेय धुमाळ यांच्या वडि‍लांनी आवळ्याची लागवड करायला सुरुवात केली होती. तर दत्तात्रेय यांनी आधुनिकतेची कास धरून सेंद्रिय आवळ्याची शेती हा एक नवा पर्याय शेतकर्‍यांसमोर उभा केला (Farmers Success Story).

आवळा (Amla Farming) हे कोरडवाहू पीक (Dryland Crop) असल्यामुळे धुमाळ कुटुंबियांनी त्याचं उत्पादन घ्यायचे ठरविले. आपल्या सव्वा एकर क्षेत्रात त्यांनी आवळ्याच्या झाडांची लागवड केली. दत्तात्रेय यांच्या वडि‍लांनी 10 वर्षांपूर्वी लावलेल्या आवळ्याच्या झाडांपासून आता शेकडो किलो आवळे मिळतात. त्यातून त्यांची लाखो रूपयांची कमाई होते. पिता-पुत्र मिळून आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीच्या शेकडो हून अधिक आवळ्याच्या झाडांचे संगोपन करतात. यापैकी एका झाडापासून 100 ते 110 किलो आवळ्याचं उत्पादन मिळते. या आवळ्याची विक्री महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येदेखील केली जाते. शिवाय परराज्यातील व्यापारी धुमाळवाडीत आल्यानंतर शेताच्या बांध्यावरूनही आवळा खरेदी करतात. यातून आवळ्याला प्रति किलो 50 ते 60 रूपयांचा दर मिळत असल्याचे दत्तात्रेय धुमाळ सांगतात. दत्तात्रेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आवळ्याच्या झाडाचा हंगाम वर्षातून दोनदा घेतात. एका हंगामात सरासरी आवळ्याच्या विक्रीतून 3 ते 4 लाख रूपयांचं उत्पन्न मिळत. असे वर्षाच्या 2 हंगामात खर्च वगळून साधारण 6 ते 7 लाख रुपये एवढा नफा मिळतो (Farmers Success Story). त्यामुळे आवळ्याच्या उत्पादनातून हे कुटुंब अत्यंत सुख-समाधानाचं आयुष्य जगत आहे.