हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीमध्ये रेकॉर्डब्रेक उत्पादन घेणारे शेतकरी (Farmers Success Story) आपल्याला सर्वांना माहित आहेत. परंतु आज आपण अशा शेतकर्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने त्याच्या केळी बागेत आधुनिक प्रगत तंत्राचा वापर करून भरघोस उत्पन्न तर मिळवलेच शिवाय त्याने वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे त्याचे नाव मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड’ (Magic Book of Records) मध्ये सुद्धा नोंदवले गेले आहे (Farmers Success Story).
धीरेंद्र देसाई (Dhirendra Desai) हे गुजरातच्या (Gujrat Farmer) भरूच जिल्ह्यातील पानेथा नावाच्या एका छोट्या गावात राहणारे एक यशस्वी शेतकरी आहेत, जे केळीच्या शेतीतून दरवर्षी लाखोंची कमाई करत आहेत. 1991 मध्ये केळीची लागवड (Banana Farming) करून त्यांनी शेतीची सुरुवात केली. चांगल्या पिकासाठी ऊती संवर्धन, ठिबक सिंचन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यासारख्या प्रगत तंत्रांनी शेती करण्यात त्याचा हातखंडा आहे. म्हणूनच कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा (Advanced Agriculture Technology) अवलंब केल्यामुळे धीरेंद्र सिंग यांचे नाव मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्येही (Farmers Success Story) नोंदवले गेले आहे.
गावासाठी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय
शेतकरी धीरेंद्र देसाई यांनी सांगितले की त्यांची शाळा 7 किलोमीटर अंतरावर होती व कोणत्याही प्रकारची वाहतुकीची सोय तेव्हा नव्हती. शिक्षणासाठी त्याला खूप पायपीट करावी लागायची. त्यामुळे गावासाठी काहीतरी नवीन करायचे ठरवून ते कुटुंबासह शेतीला जोडलेत्यानुसार 1991 मध्ये त्यांनी केळीची लागवड केली.
याशिवाय धीरेंद्र हे रेवा बागायत मंडळ शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन केली. व स्वतः या शेतकरी उत्पादक संघटनेत पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले व कालांतराने मुख्य लेखापाल आणि व्यवस्थापक झाले (Farmers Success Story).
G9 जातीच्या केळीची लागवड (G9 Banana Variety)
धीरेंद्र त्यांच्या यशाचे श्रेय प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब याला देतात. त्यांनी अकार्बनिक आणि सेंद्रिय पोषक घटकांचे संतुलित 70:30 गुणोत्तर वापरून टिश्यू कल्चर, ठिबक सिंचन आणि एकात्मिक पोषक व्यवस्थापन यासारख्या प्रगत तंत्रांचा अवलंब केला (Farmers Success Story).
केळीच्या फुलांचे विघटन करण्याचा प्रयोग देखील धीरेंद्र करतात. ही एक अशी पद्धत आहे जी बुरशीचे आणि कीटकांच्या हल्ल्याचा धोका कमी करते, ज्यामुळे उच्च दर्जाचे उत्पादन सुनिश्चित होते. यासाठी सर्वप्रथम, फुलकिडी आणि कीटक काढून टाकण्यासाठी इंजेक्शन देतात. नंतर वाळलेली फुले काढून टाकतात. ही क्रिया करणे आवश्यक आहे असे ते म्हणतात कारण जर असे केले नाही तर, वाळलेल्या फुलामुळे केळीवर डाग पडतात. यानंतर ते फवारणी आणि कापणी या तंत्राने केळीची गुणवत्ता सुधारतात (Farmers Success Story).
धीरेंद्र त्यांच्या शेतात फक्त G9 जातीच्या केळीची लागवड करतात. केळीच्या या सुधारित जातीमुळे केळीच्या इतर जातींपेक्षा जास्त उत्पादन मिळते. ही जात प्रति झाड 225-250 फळे देते. धीरेंद्र हा भारतातील एकमेव शेतकरी आहे ज्याने अवघ्या 26 महिन्यांत केळीची तीन पिके घेतली आहेत. त्यामुळे त्यांना हेक्टरी 16.70 लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळाले (Farmers Success Story).
केळी प्रक्रिया आणि रोजगार निर्मिती
धीरेंद्र यांच्या केळीला मध्यपूर्व भागात वेगळी ओळख मिळाली आहे (Farmers Success Story). यामुळे त्यांनी आपल्या गावात केळी चिप्स निर्मिती युनिटची (Banana Processing Unit) स्थापना केली, ज्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. पाणेठा सारख्या अतिरिक्त भागात पाण्याच्या उपलब्धतेमुळे केळी लागवड हा एक फायदेशीर व्यवसाय बनला आहे.