हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने (Farmers Success Story) आपल्या 30 एकर शेतात बियाणे प्लॉट तंत्र आणि टिश्यू कल्चर (Tissue Culture Potato Seed Production) यांसारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करून यशस्वी बटाटा लागवडीचे एक नवे मॉडेल तयार केले आहे. जाणून घेऊ या शेतकऱ्याची यशोगाथा (Farmers Success Story) .
उत्तर प्रदेशातील इटावा येथील रामकरन तिवारी (Ramkaran Tiwari) हा शेतकरी 2015 पासून बटाट्याची लागवड करत आहेत. रामकरन कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय शेती करत करत असले तरी सुरुवातीपासूनच कृषी क्षेत्रात नवीन काहीतरी करण्याची त्यांच्याकडे एक दृष्टी होती (Farmers Success Story). त्यांना हे सिद्ध करायचे होते की, योग्य पद्धतीने शेती केली तर हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. ते म्हणतात “शेती हे माझ्या रक्तात आहे, परंतु माझा नेहमी विश्वास होता की तो जीवनाचा फक्त एक मार्ग नसून त्यापेक्षाही जास्त आहे. हा एक व्यवसाय, अभिमान आणि समृद्धीचा स्रोत आहे”.
टर्निंग पॉइंट: नवीन तंत्रज्ञान शिकून अवलंब करणे (Farmers Success Story)
रामकरनचा यशाचा प्रवास सोपा नव्हता. अनेक शेतकऱ्यांप्रमाणेच, त्यांना सुद्धा अनिश्चित हवामान, बाजारभाव चढ-उतार आणि पुरेशा प्रमाणात उत्पादन करण्याचा सततचा दबाव यासारख्या शेतीतील विविध आव्हानांचा सामना करावा लागला. पण त्याला माहीत होते की जर त्यांना काहीतरी मोठे साध्य करायचे असेल तर त्यासाठी नवनवीन प्रयत्न करावे लागतील (Farmers Success Story).
रामकरनच्या शेती कारकीर्दीतील टर्निंग पॉइंट म्हणजे ते शिमला येथील सेंट्रल बटाटा रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) येथे प्रशिक्षण सत्रात सहभागी होणे हा होता. या प्रशिक्षणाची शिफारस उत्तर प्रदेशच्या कृषी विभागाने केली होती आणि ते त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरले.
“सीपीआरआयमध्ये, मी बियाणे प्लॉट तंत्राबद्दल शिकलो, ज्यामुळे मी बटाटा शेतीमध्ये (Potato Farming) क्रांती घडवून आणली. ते फक्त एक तंत्र नव्हते; शेतीबद्दल विचार करण्याचा तो एक नवीन मार्ग होता,” असे रामकरन म्हणतात.
सीपीआरआयकडून मिळालेले ज्ञान आणि इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) कडून मिळालेल्या पाठिंब्याने रामकरन यांनी केवळ तंत्रे राबवली नाहीत – तो एक पाऊल पुढे गेला. त्यांनी त्यांच्या शेतावर एक लहान टिश्यू कल्चर प्रयोगशाळा बांधली, ज्यामुळे त्यांना उच्च दर्जाचे बटाटा बियाणे (Potato Seed Production) तयार करता आले. या गुंतवणुकीने त्यांना भरघोस मोबदला दिला, भरपूर पीक आणि ग्राहकांना आवडणारे उत्पादन या दोन्हीची खात्री झाली (Farmers Success Story).
शिवम सीड्स फार्मचा उदय
आज रामकरण तिवारी ‘शिवम सीड्स फार्म’ चालवतात, जो त्यांचा मुलगा शिवम तिवारी याच्या नावावर आहे, जो बी.टेक इंजिनियर आहे आणि शेतीच्या व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावतो. एकत्रितपणे, ते आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपारिक शेती पद्धतीचा एकत्रित वापर करतात. यामुळे यशस्वी शेती होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. 30 एकरांमध्ये पसरलेल्या या फार्ममध्ये दरवर्षी 3,500 ते 4,000 क्विंटल बटाट्याचे प्रभावी उत्पादन (Potato Production) होते. रामकरनच्या शेतीचे वेगळेपण म्हणजे बटाट्याची विस्तृत विविधता आणि उच्च दर्जा (Farmers Success Story).
“आम्ही कुफरी लिमा, कुफरी संगम आणि कुफरी बहार यासह बटाट्याच्या दहा पेक्षा जास्त जाती(Potato Variety) वाढवितो. प्रत्येक जातीची काळजीपूर्वक आणि बारकाईने लक्ष देऊन लागवड केली जाते, आमच्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे उत्पादन मिळेल याची खात्री करतो,” असे रामकरन अभिमानाने सांगतात.
परंतु रामकरन फक्त उच्च दर्जाच्या बटाट्याचे उत्पादन करून थांबले नाहीत. त्यांनी आधुनिक विपणन तंत्र आत्मसात केले, सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांशी थेट संपर्क साधला. पारंपारिक बाजारातील विक्रीवर अवलंबून न राहता, रामकरन त्याच्या उत्पादनाविषयी ऑनलाइन पोस्ट करतात. त्यांना यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे (Farmers Success Story).
“ग्राहक बटाटे खरेदी करण्यासाठी थेट शेतात येतात. त्यांना आमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्याशी घट्ट नाते निर्माण केले आहे. किंमत योग्य आहे आणि बाजारात चढ-उतार असले तरी, आमच्या ग्राहकांना माहित आहे की ते आमच्यावर अवलंबून राहू शकतात” असे रामकरन म्हणतात.
समुदायावर प्रभाव: बदलासाठी एक उत्प्रेरक
रामकरनच्या यशाचा फायदा फक्त त्यांच्या कुटुंबालाच झाला असे नाही तर त्याचा संपूर्ण समाजावर खोलवर परिणाम झाला आहे. त्याच्या नाविन्यपूर्ण शेती तंत्रामुळे आणि उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनामुळे, इटावा एकेकाळी पंजाब आणि हरियाणामधून बटाटे आयात करणाऱ्या प्रदेश होता तो आता या राज्यांनाच बटाटे निर्यात करणारा प्रदेश झालेला आहे (Farmers Success Story).
“आम्ही बटाटे आयात करायचो, पण आता आम्ही त्यांची निर्यात करत आहोत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि आम्ही येत्या काही वर्षांत आमची उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,” असे रामकरन सांगतात.
रामकरन यांचे शेत हे समाजातील अनेकांसाठी रोजगार आणि उपजीविकेचे महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यांच्या यशोगाथेने इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पद्धतीत नवनवीन शोध आणि गुंतवणूक करण्यास प्रेरित केले आहे.
भविष्यासाठी योग्य गुंतवणूक
रामकरन एक सुज्ञ गुंतवणुकदार सुद्धा आहेत. दरवर्षी ते शिवम सीड्स फार्ममध्ये 20-25 लाख रु.च्या दरम्यान गुंतवणूक करतात आणि यातून त्यांना जवळपास 1 कोटी रुपयाचा भरीव नफा मिळतो. परंतु रामकरनसाठी, खरी मिळकत केवळ आर्थिक लाभ नाही तर काहीतरी अर्थपूर्ण आणि चिरस्थायी निर्माण केल्याचे समाधान आहे (Farmers Success Story).
“मी नेहमी इतर शेतकऱ्यांना स्वतःचा ब्रँड तयार करायला सांगतो आणि दर्जेदार बियाणे आणि प्रशिक्षणात गुंतवणूक करायला सांगतो. जर आपण योग्य मानसिकतेने आणि तंत्राने शेती केली तर ती खूप फायदेशीर ठरू शकते,” असे रामकरन सांगतात.
सन्मान आणि पुरस्कार (Farmers Success Story)
- डिसेंबर २०२३ किसान सन्मान सोहळ्या दरम्यान बटाटा उत्पादनासाठी राज्यातील तृतीय पुरस्कार
- लखनऊ येथे आयोजित 2020 मध्ये राज्य फळ, भाजीपाला आणि फ्लॉवर प्रदर्शनात 500-ग्रॅम आकाराच्या लाल बटाट्याच्या जातीसाठी तिसरे पारितोषिक.
पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा: यशाचा वारसा
रामकरन तिवारी यांचे यश केवळ त्यांनी उत्पादन केलेल्या बटाट्यांमध्ये मोजले जात नाही तर ते इतरांसाठी आणि देशभरातील शेतकऱ्यांना कसे प्रेरणादायी आहे यात आहे.
“मला वाटते प्रत्येक शेतकऱ्याने विश्वास ठेवायला हवा की ते देखील महान गोष्टी साध्य करू शकतात. शेती हा केवळ जीवनाचा एक मार्ग नाही – तो यशाचा आणि पूर्णतेचा मार्ग आहे.” असे ते शेतकऱ्यांना सांगतात. रामकरन यांची यशोगाथा सिद्ध करते आपली पायाखालची जमीन सुद्धा आपल्याला यशस्वी होण्याची संधी देऊ शकते. आणि एक नम्र शेतकरी सुद्धा एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो (Farmers Success Story).