हॅलो कृषी ऑनलाईन: आर्थिक संघर्ष आणि कठीण परिस्थितीत बरेचदा शेतकरी (Farmers Success Story) कोलमडतात. परंतु आज आपण एका शेतकरी महिलेची यशोगाथा जाणून घेणार आहोत जिने नैसर्गिक शेतीचा (Natural Farming) अवलंब करून स्वतःला नैराश्येतून बाहेर तर काढलेच, शिवाय कुटुंबाला सुद्धा आर्थिक आधार दिला (Farmers Success Story).
या शेतकरी महिलेचे नाव आहे मंगला वाघमारे (Mangala Waghmare). लातूरची अल्पभूधारक महिला शेतकरी (Woman Farmer) मंगला काही वर्षांपूर्वी, वाढत्या कर्जामुळे आणि खायला अन्न नसल्याने ती खोल नैराश्यात गेली. अर्धा एकर शेतीसाठी 25,000 रुपयाचे कर्ज काढूनही (Agriculture Loan) शेतीचे तिचे प्रयत्न निष्फळ ठरले. शिवाय, पतीच्या हॉस्पिटलची बिले आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाचा असह्य भार निर्माण झाला. या सर्व समस्यांना कंटाळून मंगलाने स्वतःचा जीव घेण्याचा विचार सुद्धा केला होता.
निराशेतून आशेपर्यंतचा प्रवास (Farmers Success Story)
अशा कठीण परिस्थितीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे नैसर्गिक शेती तज्ज्ञ महादेव गोमारे तिच्या मदतीसाठी पुढे आले आणि तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांनी केवळ तिची शेती सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले नाही तर तिला आध्यात्मिकरित्या सुद्धा सक्षम केले. तिला सुदर्शन क्रिया, श्वासोच्छवासाचे तंत्र आणि ध्यान यासारख्या पद्धती शिकवल्या. या साधनांमुळे मंगलाला तिची मानसिक ताकद परत मिळण्यास मदत झाली आणि आयुष्याला कलाटणी देण्याचा संकल्प केला.
आज मंगला वर्षाला दोन लाख रुपये कमावते. शेती व्यतिरिक्त, ती जनावरे पाळते, दूध विकते आणि तिच्या गावात ब्युटी पार्लर आणि टेलरिंग शॉप दोन्ही चालवते. तिच्या समर्पण आणि परिश्रमाने तिला सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कारही मिळाला. अवघ्या अर्धा एकर जमिनीसह तिने आपल्या मुलाच्या बी.टेक. शिक्षणालाच हातभार लावला सोबतच सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही केला (Farmers Success Story).
नैसर्गिक शेती: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत उपाय
रासायनिक शेती, ज्यामुळे कर्ज आणि मातीचे आरोग्य खराब होते, त्यापेक्षा मंगला नैसर्गिक शेतीकडे वळली. ही शाश्वत पद्धत घरी तयार केलेल्या इनपुटवर अवलंबून असते जे स्वस्त तर असतेच शिवाय यात माती आणि बियांच्या नैसर्गिक पद्धतीने वापर केला जातो. बहु-पीक, कृषी वनीकरण आणि हवामानास अनुकूल शेतीच्या प्रशिक्षणाद्वारे मंगलाने निरोगी उत्पन्न राखून तिच्या उत्पादन खर्चात लक्षणीय घट केली (Farmers Success Story).
नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यापूर्वी, मंगलाच्या कमाईपैकी 75% रक्कम शेती निविष्ठांवर खर्च व्हायची, फक्त 25% तिच्या कुटुंबाच्या गरजा, जसे शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी उरायचे. बचत नसल्यामुळे तिच्यावर सतत आणखी कर्ज घेण्याचा दबाव जाणवत होता. पण नैसर्गिक शेतीमुळे ती आता स्वतःची रोपे, जैव-खते आणि कीटकनाशके देशी गाईची उत्पादने आणि पौष्टिकतेने युक्त वनस्पती वापरून तयार करते. बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी मंगलाने टोमॅटो शेती केली आणि अवघ्या तीन महिन्यांत तिला 60,000 रु.चा नफा झाला (Farmers Success Story).
नवीन पिढीसाठी प्रेरणा
मंगलाचे यश हे इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. आजपर्यंत तिने शंभरहून अधिक महिलांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. महादेव गोमारे यांच्याकडून शिकलेले एक एकरचे मॉडेल तिने इतर महिलांना शिकवले आहे.
शेतीच्या पलीकडे मांजरा नदीचे पुनरुज्जीवन करून लातूरच्या जलसंकटाचा सामना करण्याच्या प्रयत्नांचाही ती एक भाग आहे. लातूरमधील 10,000 हून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती प्रशिक्षणाचा फायदा झाला आहे, ज्यामुळे त्यांची माती अधिक शाश्वत बनवून त्यांचा खर्च कमी झाला आहे. या पद्धतीमुळे आता शेतकरी वर्षातून दोन पिके घेऊ शकतात, ही एक अकल्पनीय उपलब्धी आहे.
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी मंगलाची बांधिलकीही तितकीच उल्लेखनीय आहे. तिने महिलांचा एक गट तयार केला जिथे ती एक एकर नैसर्गिक शेती मॉडेलद्वारे स्वयंपूर्णतेचे शिक्षण देते (Farmers Success Story). त्यांचे पती, मारुती वाघमारे अभिमानाने सांगतात, “10 एकर असलेल्या शेतकऱ्याने मुंबईला पिके पाठवणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु एका छोट्या गावात अर्धा एकर असलेल्या शेतकऱ्याने असे करणे ही एक उपलब्धी आहे”.
नैसर्गिक शेती आणि अध्यात्मिक वाढीद्वारे मंगलाचा खोल निराशेतून यशापर्यंतचा प्रवास, लहान शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. त्यांना कर्जातून बाहेर पडण्याचा आणि उज्वल, अधिक शाश्वत भविष्याकडे मार्ग दाखवतो.
मंगलाची कहाणी विलक्षण आहे, विशेषत: आपल्या देशात देशात जिथे मध्यम आणि अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. आज देशातील कटू वास्तव आहे की आत्महत्या करणाऱ्या 72% पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे आणि यापैकी बहुतेक शोकांतिका कर्जाशी जोडलेल्या आहेत. मंगला या चक्रातून मुक्त होण्यात यशस्वी झाली आणि आता ती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे (Farmers Success Story).