हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुमहाला माहिती आहे का की तुम्ही सुद्धा तुमची कंपनी स्थापन करू शकता. कृषी विभाग अशा कंपनीसाठी मदत देखील करते. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत अशा अनेक योजना आहेत ज्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. योजनेअंतर्गत कंपनीची स्थापना करू शकता या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कर्ज, विमा व सामूहीक शेती करून त्या शेती मालाला मार्केट मिळवून देणे हा उत्पादक कंपनी मागचा हेतू आहे. शेती आणि शेतीपूरक उद्योग करण्यासाठी तरुणांना ही उत्तम संधी आहे.
कृषी विभाग तसेच शेतकऱ्यांनी स्व:ताहून अशा कंपन्यांची स्थापना ही केलेली आहे. राज्यात 3081 कंपन्यांची नोंद झालेली आहे. यापैकी 2214 ह्या कंपन्या स्व:ता शेतकऱ्यांनी स्थापीत केलेल्या आहेत. या कंपनीची नोंद ही मिनीस्टर ऑफ कोर्परेट अफेअर्स यांच्याकडे होते. याकरीता कंपनीतील 10 सदस्य हे शेतकरीच असणे आवश्यक आहे. ज्याचा लाभ शेतीशी निगडीत व्यवसाय वाढवण्यासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता
१)एका कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत-कमी 10 शेतकरी असणे आवश्यक आहे.
२)दोन वेगवेगळ्या कंपन्याही एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करु शकतात.
कसे करावे कंपनीचे रजिस्ट्रेशन
— कंपनीचे रजिस्ट्रेशन संधी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी कींवा वकीलामार्फत करता येणार आहे.
–शेतकरी उत्पादक कंपनीत महिला शेतकऱ्याचा सहभाग असल्यास योजनांचा लाभ अधिक प्रमाणात घेता येणार आहे.
–कंपनी स्थापनेचा प्रस्ताव संबंधित सी.ए. संधी लेखापाल यांच्यामार्फत मिनीस्टर ऑफ कोर्परेट अफेअर्स यांच्याकडे वर्ग होतात आणि त्यानंतर कंपनी स्थापन करण्याची म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ इनकॅार्पेरेशन चे परवानगी पत्र हे आठ दिवसामध्ये दिले जाते.
–संबंधित माहीती कृषी अधिकारी जुबेर पठान यांनी दिली असून ते बीड येथील कृषी विभागाच्या आत्मा विभागात कार्यरत आहेत.
आवश्यक कागदपत्रे
1 पॅन कार्ड
2 आधार
3 मतदान ओळखपत्र,
4 ड्राइविंग लायसन्स
4 बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक
5 कंपनीच्या डायरेक्टरचे लाईट बिल
6 10 सभासद त्यापैकी 5 डायरेक्टर
7 10 शेतकऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो व मोबाइल नंबर
संदर्भ -टीव्ही ९