Force Tractors : ‘ही’ ट्रॅक्टर कंपनी आजपासून बंद होणार; पहा… नेमकं काय आहे कारण?

Force Tractors Stops Business From Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील ट्रॅक्टर (Force Tractors) विश्वासाठी एक निराशाजनक बातमी आहे. भारतीय शेतकऱ्यांमध्ये ट्रॅक्टरची मोठी क्रेझ असून, त्यातही फोर्स कंपनीचा ट्रॅक्टर म्हटले की शेतकऱ्यांना एक विशेष आकर्षण असते. मात्र भारतीय बाजारामध्ये आता शेतकऱ्यांना फोर्स कंपनीचा कोणताही ट्रॅक्टर विक्रीसाठी पाहायला मिळणार नाही. कारण ‘फोर्स मोटर्स’ या आघाडीच्या कंपनीकडून अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्यात आली आहे. फोर्स या नामांकित ट्रॅक्टर निर्माता कंपनीने आपली ट्रॅक्टर निर्मिती (Force Tractors) किंवा त्यासंबंधीचे सर्व व्यवहार आजपासून अर्थात 31 मार्च 2024 पासून पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे.

काय आहे कारण? (Force Tractors Stops Business From Today)

फोर्स या आघाडीच्या ट्रॅक्टर निर्माता कंपनीने आपल्या ट्रॅक्टरची निर्मिती (Force Tractors) थांबवण्यामागे कोणतेही स्पष्ट कारण सांगितलेले नाही. मात्र, प्रोडक्ट रेशनलाइजेशन प्रोग्रॅमअंतर्गत या निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. अर्थात कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये काही बदल करून, त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. असे कंपनीने म्हटले आहे. फोर्स कंपनी ही प्रामुख्याने नागरी वाहन निर्मिती आणि संरक्षण क्षेत्रातील वाहन निर्मिती उद्योगात कार्यरत आहे. ज्यामुळे ट्रॅक्टरशिवाय अन्य वाहन निर्मिती उद्योगावर लक्ष केंद्रित कारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कमाईत केवळ 3.66 टक्के हिस्सा

फोर्स कंपनी ही मुळात महाराष्ट्रातील असून, कंपनीच्या 2023 या चालू आर्थिक वर्षातील एकूण कमाईत ट्रॅक्टर विक्रीचा (Force Tractors) हिस्सा हा 3.66 टक्के इतका राहिला आहे. अर्थात कंपनीच्या एकूण व्यवसायात 4 टक्क्यांपेक्षा कमी ट्रॅक्टरची विक्री नोंदवली गेली आहे. अर्थात एकूण व्यवसायात ट्रॅक्टर निर्मितीचा हिस्सा खूपच कमी राहिला आहे. ज्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. फोर्स कंपनी प्रामुख्याने मल्टी सीटर गाड्या तयार करण्याच्या व्यवसायात गुंतली आहे. सध्या रस्त्यांवर फोर्स कंपनीच्या अनेक गाड्या वापरात दिसतात. त्यामुळे आपल्या एका विशिष्ट व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीने आजपासून ट्रॅक्टर निर्मितीचा बिझनेस थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

फोर्स कंपनी कार निर्मितीत सुसाट

फोर्स कंपनी ट्रॅक्टर निर्मिती व्यवसायात फारशी चांगली कामगिरी करत नसली. तरी देशात बीएमडब्लू आणि मर्सिडीज गाड्यांचे इंजिन बनवण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. कंपनीच्या एकूण व्यवसायात कार विक्रीचा वाटा 48 टक्के आहे. याशिवाय कंपनी करार पद्धतीने काही गाड्यांचे इंजिन देखील बनवते. ज्यातून कंपनीला 36 टक्के फायदा मिळतो. कंपनीचा वार्षिक अहवाल पाहता, मागील चारही तिमाहीत कंपनीचा नफा नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळानंतर कंपनीच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे कंपनीच्या आकडेवारीवरून दिसून येते.