हॅलो कृषी ऑनलाईन: मोसंबीच्या अंबिया बहाराची फळगळ (Fruit Drop In Citrus) ही एक मोठी समस्या मोसंबी उत्पादक शेतकर्यांसमोर मागील पाच वर्षांपासून निर्माण झाली आहे. यंदा तर जुलैच्या सुरुवातीलाच मोसंबीची (Sweet Orange) फळगळ सुरू झाली आहे. जाणून घेऊ या फळगळ (Fruit Drop In Citrus) होण्याची विविध कारणे आणि त्यावर उपाय.
मोसंबी फळगळ होण्याची कारणे (Reasons For Fruit Drop In Citrus)
वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ: पावसाळ्यात जमिनीत सतत पाणी साचून राहल्याने झाडाच्या मुळ्यां कुजतात, मुळ्यांना प्राणवायू अल्प किंवा मिळत नसल्याने फळांवर त्यांचा परिणाम होऊन ती पिवळी होऊन गळून (Fruit Drop In Citrus) पडतात.
बुरशीजन्य फळगळ: बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडिआ व ऑल्टरनेरिया या बुरशीमुळे होते. या बुरशीचे संक्रमण फळांवर होऊन आर्थिक नुकसानकारक फळगळ (Fruit Drop In Citrus) आढळून येते.
किटकजन्य फळगळ: फळझाडांवर प्रादुर्भाव करणाऱ्या फळमाशी तसेच रस शोषक पतंगामुळे फळगळ (Fruit Drop In Citrus) दिसून येते.
असे करा एकात्मिक व्यवस्थापन (Management Of Fruit Drop In Citrus)
वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ व्यवस्थापन (Physiological Fruit Drop)
- शेतातील पाणी बाहेर काढावे, पाणी साचून राहिल्यास बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.
- गळून पडलेल्या फळांना (Fruit Drop In Citrus) खोल खड्यात दाबून त्यांची विल्हेवाट लावावी.
- एनएए 1 ग्रॅम (10 पीपीएम) किंवा 2-4 डी* 1.5 ग्रॅम (15 पीपीएम) किंवा जिब्रेलिक अॅसिड 1.5 ग्रॅम (15 पीपीएम) सह एन एटीसीए (N Acetyl – Thiazolidine 4 Carboxylic Acid) (10 पीएम) 1 ग्रॅम + ब्रासिनोलाइड (4 पीपीएम) 0.4 ग्रॅम + फॉलिक अॅसिड (100 पीपीएम) 10 ग्रॅम + 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
- सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक सल्फेट 5 ग्रॅम, फेरस सल्फेट 1 ग्रॅम व बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन अंबिया फळांकरिता ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात तसेच मृगाच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फवारणी करावी.
बुरशीजन्यरोगापासून होणारी फळगळ व्यवस्थापन (Fruit Drop Due To Fungus Disease)
- फायटोफ्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ व फळावरील तपकिरी कुज ब्राऊन रॉट’ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसिटिल एएल” 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 डब्लूपी 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. तसेच या द्रावणांची फवारणी करीत असताना वाफ्यात सुद्धा यांची जमिनीवर फवारणी करावी.
- बुरशीनाशकाचे द्रावण टाकल्या नंतर 5 दिवसांनी 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा व 100 ग्रॅम सुडोमोनास 1 किलो शेणखतात मिसळून प्रति झाड देण्यात यावे.
- कोलेटोट्रीकम बुरशीजन्य फळगळसाठी (Fruit Drop In Citrus) बोर्डेक्स 0.6 टक्के मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 डब्लूपी 2.5 ग्रॅम किंवा अझोक्सस्ट्रोबिन + डायफेनकोणाझोल 1 मिलि प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
किटकजन्य फळगळ व्यवस्थापन (Fruit Drop Due To Pest)
- फळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रूपांतर होत असताना 10-15 दिवसाच्या अंतराने फळ तोडणी होईपर्यंत 5 टक्के निंबोळी अर्क (500 ग्रॅम/10 लिटर पाणी) किंवा निंबोळी तेल (नीम ऑइल) 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्याकरिता फळमाशी सापळे प्रति हेक्टरी 25 याप्रमाणात ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून किंवा तोडणीच्या साधारण 2 महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत.
- साधारणतः सायंकाळीच्या वेळी बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा.
- रसशोषण करणाऱ्या पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करुन बागेत ठेवावे. याकरिता 20 ग्रॅम मॅलॅथिऑन 50 ईसी 20 मिली + 200 ग्रॅम गूळ + खाली पडलेल्या फळांचा रस (400 ते 500 मिलि) 2 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येकी दोन आमिषे रूंद तोंडाच्या पसरट भांड्यात टाकून 25 ते 30 झाडामध्ये 1 याप्रमाणे लटकुन ठेवावेत.