राज्यात गारठा कायम …! धुळ्यात पारा 3.4 अंशांवर, पहा कधी निवळणार थंडी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांच्या परिणामामुळे महाराष्ट्र गारठला आहे. शुक्रवारी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात थंडीची लाट अनुभवायला मिळाली. धुळे इथं कमीत कमी 3.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजपासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील थंडीची लाट ओसरली नसली तरी गारठा मात्र कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रावातामुळे वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये थंडी पाऊस गारपीट होत आहे. तर हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरू आहे. शुक्रवारी दिनांक 28 रोजी राजस्थानातील सीकार व भीलवाडा इथं देशाच्या सपाट भूभागावरील किमान 1.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 29 रोजी मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगड, ओरिसा या राज्यात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली असून कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. शुक्रवारी दिनांक 28 रोजी राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट ही कायम होती निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 4.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भात अनेक ठिकाणी पारा दहा अंशांच्या खाली आल्याने किमान तापमानात सरासरीपेक्षा 4.5 वर्षांपेक्षा अधिक घट झाल्याने थंडीची लाट आली होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही काही ठिकाणी तापमान दहा अंशांच्या खाली गेले आहे.

पुणे आणि मुंबई येथे देखील तापमानाचा पारा घसरला असून पुण्यात हवेली इथं कमीत कमी 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर राजगुरुनगर येथे आठ अंश सेल्सिअस, माळीन 8.1, पाषाण 8.25, शिवाजीनगर 8.6, आंबेगाव 8.9 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.