शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेला राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Heavy Rainfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची ओढ लागली आहे. ऐन श्रावण महिन्यात तापमानात वाढ झाल्यामुळे पिकं करपत आहेत. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार येत्या १६ आणि १७ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही तारखांना हवामान खात्याने यलो अलर्ट जरी केला आहे.

१६ ऑगस्ट – गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिनांक 16 रोजी वर्तवली आहे.

१७ ऑगस्ट- दिनांक 17 रोजी मात्र औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, आणि कोल्हापूर या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

आज कसे असेल हवामान

आज शुक्रवारी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यात देखील हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने या वेळी व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसभर हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. तर काही भागात प्रतितास 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 10 जिल्ह्यात यंदा पावसाच्या दमदार सरी बरसणार आहेत.