शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार

Shetkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांमध्ये तौक्ते चक्रीवादळाने नुकतीच हजेरी लावली आहे. त्यानंतर आता शेतकरी ज्या बातमीची वाट पाहत असतो त्या मान्सून ची बातमी समोर आली आहे. अजूनही देशातील अनेक भागात मान्सूनच्या आगमनावर शेती केली जाते. नैऋत्य मोसमी वारे तीन दिवसात 21 मे म्हणजे शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. या शिवाय यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार होईल असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हंटले जाते. भारतीय हवामान विभागाने हे वारे एक जूनला केरळमध्ये दाखल होतील असा अंदाज वर्तवला आहे सध्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 जुलैला नैऋत्य मोसमी वारे अंदमान बेटांवर पोहोचतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार एक जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या बीबीएम .6 मिलिमीटर च्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागात संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही त्यामुळे केरळा जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.