Halad Bajar Bhav : हळद दरात मोठी वाढ; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 4 March 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच उत्पादक जिल्ह्यांमध्ये हळद (Halad Bajar Bhav) काढणी हंगाम जोरात सुरु असून, सध्याच्या घडीला काढणी हंगाम निम्म्यापर्यंत आला आहे. मात्र, असे असतानाही हळदीच्या दराने यंदा शेतकऱ्यांना चांगलीच साथ दिली आहे. राजापुरी हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली बाजार समितीत सध्या हळदीला उच्चांकी 32,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. तर हिंगोली आणि बसमत बाजार समितीत देखील हळद दरात पुन्हा वाढ झाली आहे. बाजार समित्यांमध्ये सध्या तुलनेने आवक कमी असल्याने, आगामी काळात देखील हळदीचे दर (Halad Bajar Bhav) तेजीतच राहणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 4 March 2024)

सांगली बाजार समितीत आज हळदीची (Halad Bajar Bhav) 13521 क्विंटल आवक झाली असून, कमाल 32000 ते किमान 14700 रुपये तर सरासरी 23350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. हिंगोली बाजार समितीत आज हळदीची 900 क्विंटल आवक झाली असून, कमाल 16000 ते किमान 13500 रुपये तर सरासरी 14750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. बसमत बाजार समितीत आज हळदीची 31 क्विंटल आवक झाली असून, कमाल 14500 ते किमान 13000 रुपये तर सरासरी 13700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

मुंबई बाजार समितीत आज हळदीची (Halad Bajar Bhav) 97 क्विंटल आवक झाली असून, कमाल 20000 ते किमान 15000 रुपये तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सेनगाव बाजार समितीत आज हळदीची 9 क्विंटल आवक झाली असून, कमाल 13000 ते किमान 10000 रुपये तर सरासरी 12000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. भोकर बाजार समितीत आज हळदीची 10 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 10000 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

सहा महिने दर स्थिर राहणार

सध्यस्थितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेला दर, नक्कीच त्यांची आर्थिक घडी उजरवणारा आहे. मागील तीन ते चार वर्षांपूर्वी हळद उत्पादकांना उत्पादन खर्च मिळवणे ही अवघड झाले होते. मात्र, असे असले तरी सध्या बाजारात हळदीला मिळत असलेला दर हा आगामी सहा महिने तरी स्थिर राहणार असल्याचा अंदाज हळद व्यापारातील जाणकार व्यक्त करत आहेत. यंदा एकूणच देशपातळीवर हळद उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली असून, राज्यातही शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात, नेहमीपेक्षा घट पाहायला मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे हळद दराला मोठा आधार मिळत आहे.