हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काढण्यात आलेल्या राजापुरी हळदीस प्रतिक्विंटल 32 हजार रुपये विक्रमी भाव मिळाला. सांगलीच्या बाजारपेठेत हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांनी माल घेवून यावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले.
जिल्ह्यात नवीन हळद बाजारात दाखल होत आहे. फे.बु्रवारीच्या सुरुवातीस हळदीचे सौद्यांना सुरुवात झाली आहे. आवक चांगली होत आहे. दरही चांगला मिळत आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथील आण्णासो वसंत ओमासे यांची हळद एन. बी. पाटील यांच्या दुकानात सौद्यास आली होती. या हळदीस प्रतिक्विंटल 32 हजार रुपये इतका दर मिळाला. ही हळद मनाली ट्रेंडींग कंपनीने खरेदी केली. हळद सौद्यासाठी प्रतिक्विंटल कमीत-कमी नऊ हजार व जास्तीत-जास्त 32 हजार रुपये असा दर सुरु आहे.
बाजारात सरासरी 14 हजार असा दर मिळत आहे. शेतकर्यांनी आपली हळद जास्तीत जास्त विक्रीसाठी सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती येथे घेऊन यावी. तसेच शेतकर्यांसाठी सुरु असणार्या शासनाच्या हळद, बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पाटील आणि सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे. हळद सौद्यासाठी आडते, व्यापारी, खरेदीदार, हमाल, तोलाईदार व शेतकरी उपस्थित होते.