Havaman Andaj : आजपासून पुढील 4 दिवस ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट, वाचा एका क्लिकवर

havaman andaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून खरीप हंगामातील पिके करपून चालली आहेत. पाऊस नेमका कधी पडणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यामध्ये आता पावसाबाबत हवामान विभागाने एक मोठी अपडेट दिली आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाची सुरुवात होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिला आहे.

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?

तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे अनेकांना घरी बसून सर्व गोष्टींची माहिती पाहिजे असते. याच गोष्टीचा अभ्यास करून आम्ही देखील तुमच्यासाठी एक खास ॲप बनवले आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या अगदी दोन मिनिटात तुमच्या गावांमध्ये कधी पाऊस पडणार याबाबतची माहिती जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर सरकारी योजना, शेती कायदे, पशुंची खरेदी विक्री, शेतमालाचे बाजार भाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत घरबसल्या पाहू शकतात. त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi अँप मोबाईल मध्ये इंस्टॉल करा.

राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

राज्यात गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाचा खंड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे. आगामी पाच दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होण्याची शक्यता आहे. दि. २९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. देशात उत्तर प्रदेश आणि राजस्थान वगळता उर्वरित सर्वत्र हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या चाचपणी: मंत्री गुलाबराव पाटील

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी मी स्वतः कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत प्रश्न मांडला आहे, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव यांनी सांगितले आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण असावे लागते. तांत्रिक अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेत निर्णय घेतला जाईल, अशीही माहितीही श्री. पाटील यांनी दिली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यभरात 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. त्यामुळे राज्यासाठी थोडीफार का होईना मात्र ही दिलासा देणारी बातमी आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने पुण्याचा पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातून बहुतांशी जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असून पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे.

दरम्यान, मागच्या दोन-तीन दिवसापासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईत हलक्या सरी बरसल्या आहेत त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र राज्यातील अनेक भागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर खरीप पिके वाया जाऊ लागले असून सरकारने लवकरात लवकर याबाबत ठोस निर्णय घ्यावा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.