हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या टोमॅटोला चांगला बाजारभाव (Tomato Rate) मिळत असून त्यामुळे शेतकर्यांमध्ये (Farmers) समाधानाचे वातावरण आहे. टोमॅटोचे एक क्रेट 900 रूपयांना विकले जात आहे. बाजारात भाज्यांची आवक कमी (Shortage Of Vegetable) झालेली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर (Vegetable Bajar Bhav) देखील कडाडले आहेत. यात आता टोमॅटोला देखील चांगला दर (Tomato Rate) मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जुन्नरच्या (Junnar) नारायणगाव (Narayangaon Bajar Samiti) उपबाजारात एका कॅरेटला 700 रूपयांच्या वर उच्चांकी दर मिळत आहे. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक अनिश्चित बाजारभावाचे पीक म्हणून टोमॅटो ओळखले जाते. दर (Tomato Rate) मिळाला तर ठीक, नाही तर तो फेकून देण्याची वेळ येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, भराडी, पारगाव, काठापूर भागात टोमॅटोच्या बागा बांधणीची कामे जोरात सुरू आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी हंगामात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. यंदाही टोमॅटोचे पीक शेतकर्यांनी घेतले.
परंतु, सुरुवातीला बाजारभावाची साथ मिळालीच नाही. अनेक शेतकर्यांनी बागा सोडून दिल्या. आता मात्र टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. या भागात यंदा टोमॅटोचे घेण्यात आलेले उत्पादन फलदायी ठरले आहे.
किरकोळ बाजारात दुप्पट भाव
बाजार समितीत टोमॅटोला चांगला भाव (Tomato Rate) मिळत असल्याने प्रति किलोला हा दर 40 ते 50 रुपये आहे. दहा दिवसांपूर्वी किलोला हाच भाव 20 ते 25 रुपये मिळत होता. आता टोमॅटोला दुप्पटीने दर मिळत आहे.
आवक घटली
नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक घटली असल्याने टोमॅटोला आता उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. एक नंबर टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला मागील 2 दिवसांपासून आणि आज सकाळी तब्बल 800 पेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर सरासरी हा भाव 600 ते 900 रुपये दर (Tomato Rate) मिळत आहे.