हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे पाहतात. कांद्याचा उपयोग रोजचे जेवण, मसाले, पदार्थाला स्वाद सुगंध आणि पौष्टिकता प्रदान करण्यासाठी केला जातो. त्यामुळे कांद्याला नेहमीच मागणी असते. Kanda Lagwad Mahiti
कांद्याच्या शेतीबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात जवळपास एक लाख हेक्टर वर कांद्याची शेती केली जाते. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे कांदे लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात देखील कांद्याची शेती केली जाते. आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ देखील महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. तुम्ही देखील कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि चांगला नफा कांदा पिकातून मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
कांद्याच्या शेती साठी महत्वाच्या बाबी
1) कांदा हे हिवाळी हंगामातील पीक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची दोन ते तीन पिके घेतली जातात. लागवडीपासून एक ते दोन महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते. Kanda Lagwad Mahiti
2) याकरिता पाण्याचा निचरा होणारी भुसभुशीत जमीन व सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमीन कांद्याला चांगली मानवते.
3) पूर्व मशागतीसाठी जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.
5) महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर तर रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करावी.
6) हेक्टरी कांद्याचे दहा किलो बियाणे पुरेसे असते.
7) कांद्याची रोपे गादी वाफे तयार करणाऱ्या क्षेत्राची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. गादीवाफा एक मीटर रुंद व तीन मीटर लांब आणि 15 सेंटिमीटर उंच करावा वाफ्यातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत वाफेच्या रुंदीशी समांतर अशा पाच सेंटीमीटर बोटाने रेषा पाडाव्यात आणि यात बी ओळीत पातळ पेरावे आणि नंतर मातीने झाकून टाकावे बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे. Kanda Lagwad Mahiti
8) कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र 50 किलो स्फुरद 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे नंतर एक महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्त्वाचं असतं खरीप हंगामात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात सहा ते आठ दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
9) रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी तीन आठवडे अगोदर पाणी बंद करावे. म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो आणि माना पडून कांदा काढणीस तयार होतो.
कांद्यासाठी सुधारित वाण
कांद्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सुधारित वाणांची माहिती असायला हवी, जेणेकरून पिकाचे उत्पादन व उत्पन्न चांगले राहते. कांद्याची बसवंत 780 जात उत्पादनाच्या दृष्टीने चांगली मानली जाते. ही जात 100 ते 110 दिवसांत पक्व होते. त्याची उत्पादन क्षमता 250 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर आहे. याशिवाय कांद्याचा आणखी एक प्रकार आहे, ज्याचे नाव एन-53 आहे. ही जात 100 ते 150 दिवसात पक्व होते. त्याचा रंग चमकदार लाल आहे. त्याची उत्पादन क्षमता 200 ते 250 क्विंटल प्रति हेक्टर आहे.