परभणीत विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह भाकपचे साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यात व मराठवाड्यातील इतर साखर कारखान्यां कडून उत्पादक शेतकऱ्यांची होणारी गळचेपी व अन्याय यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर परभणी जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृत्वात सहा डिसेंबर रोजी आंदोलन केले असून यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे .

परभणी जिल्ह्यामध्ये पाण्याची मुबलकता असल्याने व साखर कारखान्याची संख्या असल्याने ऊस पिक उत्पादनाकडे शेतकरी वळले आहेत .परंतु ऊस उत्पादन वाढले असताना बऱ्याच कारखान्यांनी शेतकरीविरोधी आडमुठे धोरण अवलंबिले आहे . यासह काही कारखान्यांची ऊस गाळप क्षमता कमी आहे ती वाढवणे आवश्यक असताना तसे होत नाही त्यामुळे येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून त्यामुळे 4 डिसेंबर रोजी भाकप च्या नेतृत्वात शेतकरी पुणे साखर आयुक्त कार्यालयात धडकले होते . यावेळी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन केले .आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे .या निवेदनात शेतकऱ्यांनी पुढील मागण्या मांडल्या आहेत.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?
–पाथरी तालूक्यातील रेणुका शुगर्स लि. देवनांद्रा कारखान्याची गळीत हंगाम २०२१-२२ कालावधीत गाळप क्षमतेचा विस्तार करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियाबाबत तोडगा काढा
— श्री रेणुका शुगर्स कारखान्याची गाळप क्षमतेत वाढ करून पाथरी उपविभागातील संपूर्ण ऊस गाळपाची हमी दया
— पाथरी आणि गंगाखेड उपविभागासह परभणी जिल्ह्यातील ऊस तोडणी कार्यक्रम कालबद्ध रित्या पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपाययोजना करा
— शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी प्रत्येक साखर कारखान्यात कक्ष स्थापित करा
— साखर कारखान्याकडून अनामत रक्कम वसूल करण्याच्या गैरप्रकारांना प्रतिबंध करा यापूर्वी वसूल केलेल्या रकमा तत्काळ परत करा
— साखर कारखान्यांना तोडणी व वाहतूक क्षेत्रासाठी टप्पे निश्चित करा आणि प्रत्येक २५ किमीच्या टप्प्यावर ऊस तोडणी व वाहतूकदर निश्चित करा
— उसाच्या पाचट वजनापोटी वजावट प्रमाणात तरतुदीनुसार केवळ १ % वजावट मजूर करा व यासाठी प्रलंबित कमिटीचा अहवाल व शिफारशी या बाबत तातडीने निर्णय घ्या
— हार्वेस्टिंग यंत्राद्वारे केलेल्या ऊसतोडणी पोटी वजावट ५ % व त्यापेक्षा जास्त वजावट करणे बंद करा
— अद्यापही FRP अदा न केलेल्या सोनपेठ तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर्स सायखेडा कारखाना प्रशासनाविरुद्ध RRC जारी करा आणि शेतकऱ्यांना फरक बिले तत्काळ मिळवून दया
— परभणी तालूक्यातील लक्ष्मी नृसिंह साखर कारखाना अमडापूर द्वारा उपजिल्हाधिकारी पाथरी यांच्या १७ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे FRP फरक बिले व्याजासह तत्काळ अदा करा व टाळाटाळ केल्या प्रकरणी कारखाना प्रशासनास दंडित करा
— गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याच्या लेखा परीक्षणाची फेर तपासणी करून शेतकऱ्यांना रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्मुल्यानुसार शेतकऱ्यांच्या सहमतीने FRP दर निश्चित करा
— पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर्स लिंबा साखर कारखाना द्वारे सर्वात कमी साखरेचा उतारा दर्शविल्य प्रकरणी चौकशी करा आणि नांदेड विभागाच्या सरासरी आधारे सदर कारखान्याची रिकव्हरी आधारभूत धरून गाळप हंगाम २०२०-२१ हंगामाची FRP बिले अदा करा.
–पाथरी तालुक्यातील येथील गतवर्षी ऊस नेलेला असताना तोडणी कार्यक्रम विस्कळ करून पाथरी तालुक्यातील ऊस तोडणीस नकार देणाऱ्या जय महेश साखर कारखाना (माजलगाव जि.बीड) ,गंगाखेड शुगर्स गंगाखेड , ट्वेंटीवन शुगर्स सायखेडा ( ता . सोनपेठ ), लक्ष्मी नृसिंह साखर कारखाना अमडापूर (ता . जि परभणी ), या कारखान्या विरुद्ध कारवाई करा आणि गतवर्षीप्रमाणे ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध करा.
–उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनावर वर्ग करण्यासाठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्याद्वारे सुविधा द्या
— ऊस वाहतुकीसाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासन बांधकाम विभाग जिल्हापरिषद यांच्यात समन्वय स्थापित करा
–तोडणी व वाहतुकीचा अवास्तव खर्च दाखवून शेतकऱ्यांच्या FRP ची चोरी करणाऱ्या साखर कारखान्याविरुद्ध कारवाई करा
— सर्व खाजगी साखरकारखान्यावर शासननियुक्त लेखापरीक्षकाद्वारे पारदर्शक आर्थिक व्यवहाराची हमी दया
–FRP न दिलेल्या परभणी जिल्हयातील व मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करा व थकबाकी अदा न करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध दंडात्मक आदेश जारी करा.

अशा मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केले आहेत .या मागण्यासाठी येत्या १० डिसेंबर २०२१ रोजी पाथरी उपजिल्हाधिकारी कचेरीवर ( जि परभणी ) शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्या बाबतही सांगण्यात आले आहे .
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर कॉमेड राजन क्षीरसागर , कॉ.शिवाजी कदम , कॉ .सुभाष लिपने , कॉ .ज्ञानेश्वर काळे , सुरेश नखाते,
कॉ . कैलास लिपने यांच्यासह ओम प्रकाश नकाते ,प्रशांत नखाते ,विबीशन नखाते , भारत यादव ,तुळशीराम खेडेकर ,मदन ताल्डे ,श्याम मांयदळे ,सौरभ ताल्डे ,सावळीराम शिंदे , हनुमान ताल्डे ,दत्तात्रय केंदळे ,मुंजाभाऊ ताल्डे, शेंदशर गिराम,विठ्ठल गिराम,राहुल गिराम, नारायण दळवे ,विलास दळवे व कैलास लिपणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .