हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना नंतर आता परिस्थिती पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मेळावे प्रदर्शने देखील भरवले जात आहे. बंगळूर मध्ये कृषी मेळाव्याला काल पासून सुरवात झालेली आहे. हा कृषी मेळावा 4 दिवस चालणार आहे. प्रत्येक वर्षी हा कृषी मेळावा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नेहमी चर्चेत असतोच. यंदा च्या या कृषी मेळाव्यात कृष्णा नावाच्या या बैलाला चक्क 1 कोटी रुपयांची बोली लागलेली आहे.
कर्नाटक राज्यातील या कृष्णा नावाच्या बैलाची बोली ही 1 कोटी रुपये लागली आहे. बैलांच्या मालकाच्या म्हणण्यानुसार या बैलाचे सिमेन ची किंमत ही 1 हजार रुपयांच्या पुढे आहे. तसेच याच्या सिमेनला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे.या मुळे यंदा च्या कृषी मेळाव्यात हा कृष्णा नावाचा बैल चर्चेचा विषय बनलेला आहे. तसेच मेळाव्यात येणाऱ्या अनेक लोकांनी या बैलांबरोबर सेल्फी सुद्धा काढलेल्या आहेत.
कृष्णा ला तब्बल एक कोटींची बोली
–कृष्णा हा एक देशी गोवंश प्रजातीचा बैल आहे.
–या प्रजातीचा अंत होत चालला आहे. त्यामुळे कृष्णा चे मालक यांचा देशी जात वाढवण्याचा प्रयत्न आहे.
–तसेच हा बैल दिसायला देखणा असल्यामुळे व्यापाऱ्यांची नजर याच बैलावर पडली आणि तब्बल कृष्णा ची बोली 1 कोटी वर पोहचली.
–या बैलाची विशेष गोष्ट म्हणजे हा बैल केवळ साडे तीन वर्षांचा आहे. तसेच या बैलाचं वजन हे 800 ते 1 हजार किलोपर्यंत आहे आणि या बैलाची लांबी साडेसहा ते 8 फुटांपर्यंत आहे.
–जर का बैलाची योग्य प्रकारे काळजी घेतली तर या बैलाच आयुष्य हे 20 वर्षांहून जास्त होईल असे सुद्धा या बैलाच्या मालकाने सांगितले आहे.