राज्यात थंडी ओसरणार…! तापमान वाढणार

Heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला होता. मात्र आता थंडीची तीव्रता कमी होऊन तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात दिनांक 2 रोजी कोरडे हवामान होते. दरम्यान आजही संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

पश्‍चिमी चक्रावात त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक हवामान होत असून थंडीचा कडाका कमी होत आहे. हरियाणाच्या हिस्सार मध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 1.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान मध्य भारताच्या व महाराष्ट्राच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. रविवारी दिनांक 2 रोजी उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे राज्यातील नीचांकी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 33.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.