हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता कुठे मार्च महिना मध्यावर आला आहे. मात्र एवढ्यातच तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील किनारपट्टी भागात तर उष्णतेची लाट आली आहे. अशावेळी शेतातील भाजीपाला पिकांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, शिवाय कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे देखील महत्वाचे आहे.
पुढील २४ तासात हवामानात बदल
देशातील गुजरात राजस्थान दिल्ली या भागात तापमानात वाढ होत आहे. तर महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात देखील उष्णतेची लाट आली आहे. देशात सर्वाधिक तापमान हे ओरिसामध्ये नोंद केला गेला आहे 40.5 डिग्री सेल्सिअस कमाल तापमान ओरिसामध्ये नोंद करण्यात आले आहे पुढील २४ तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि केरळमध्ये एक किंवा दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि किनारी महाराष्ट्राच्या पश्चिम आणि दक्षिण भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण-मध्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पूर्व बांगलादेशात चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. आणखी एक चक्रीवादळ स्थिती झारखंड आणि लगतच्या भागात आहे.
या भागाला यलो अलर्ट
दरम्यान आज दिनांक 17 मार्च रोजी बुलढाणा, अकोला ,अमरावती, वर्धा आणि नागपूर या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान खात्याच्या नागपूर विभागाकडून देण्यात आला आहे.